अभिनेत्री रेखा आणि पर्सनल सेक्रेटरी फरझाना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याची अफवा
‘वय वाढणं म्हणजे फक्त आकडे वाढतात’ या वाक्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अभिनेत्री रेखा. उमराव जान, सिलसिला, खूनभरी मांग असे अनेक हिट चित्रपट दिलेल्या अभिनेत्री रेखा यांचं वय आता 68 वर्षं आहे; पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात-वावरण्यात कुठेही तिचं हे वय जाणवत नाही. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने एक काळ गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आजही चर्चेत असतात त्या फिटनेसमुळे, सौंदर्यामुळे आणि दिलखेचक हास्यामुळे. अलीकडेच आणखी एका कारणामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.
बॉलिवूडची एव्हरग्रीन दिवा असं ज्यांना म्हटलं जातं, त्या अभिनेत्री रेखा या वेळी चर्चेत आहेत त्या सेक्रेटरी फरझानामुळे. रेखा यांच्या बायोग्राफीचा आधार घेऊन अलीकडेच काही माध्यमांनी असं वृत्त दिलं होतं, की फरझाना आणि रेखा एकमेकांशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. या वृत्तामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे पसरली.
नंतर रेखा यांच्या बायोग्राफीचा लेखक यासिर उस्मान यांनी ही बाब फेटाळून लावली. रेखा आणि फरझाना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं वृत्त खोडसाळ, निरर्थक आणि निराधार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर गैरसमज दूर झाला. मात्र ही फरझाना नेमकी कोण आहे, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
फरझाना ही अभिनेत्री रेखा यांची पर्सनल सेक्रेटरी आहे. गेल्या 43 वर्षांपासून फरझाना अक्षरशः सावलीसारखी रेखासोबत राहत आहे, असं माध्यमांतली वृत्तं सांगतात.
1980 साली हेअर ड्रेसर म्हणून फरझानाने रेखा यांच्याकडे काम करायला सुरुवात केली. 1986मध्ये ती त्यांची पर्सनल सेक्रेटरी बनली आणि आजपर्यंत ती त्या पदावर कायम आहे.
एवढंच नव्हे, तर 1988 सालापासून फरझाना रेखा यांच्यासह त्यांच्या घरातच राहत आहे. रेखा यांच्या बेडरूममध्ये जाण्याची परवानगी केवळ फरझानालाच आहे. हाउसकीपिंग स्टाफही त्यांच्या बेडरूममध्ये जाऊ शकत नाही, असंही म्हटलं जातं.
फरझाना नेहमी पुरुषी कपड्यांतच वावरताना दिसते. पुरस्कार सोहळे, पार्टीज अशा सगळ्या ठिकाणी रेखा यांच्यासह फरझाना असतेच.
त्यामुळेच कोणी तरी या सगळ्याचा चुकीचा अर्थ काढला आणि अफवा पसरली. आता मात्र चरित्रलेखकानेच ती बाब खोटी असल्याचं सांगितल्याने या विषयावर पडदा पडला आहे.