मिथुन चक्रवर्ती - अमिताभ बच्चन
मुंबई, 08 एप्रिल : मिथुन चक्रवर्ती अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांनी त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला आहे. या चित्रपटाचं नाव होतं ‘मृगया’. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसंच मिथुन चक्रवर्तीच्या कामाचीही खूप प्रशंसा झाली होती. पण असं असुन सुद्धा हा चित्रपट त्यांना फारशी ओळख मिळवून देऊ शकला नाही. त्यानंतरही कित्येक दिवस मिथुन बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत होते. ‘डिस्को डान्सर’ या नावाने प्रसिद्ध असलेला मिथुन त्यावेळी स्टार नव्हता आणि याच काळात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यासोबत केलेल्या या कृतीची आजही चर्चा होते. काय होता तो किस्सा जाणून घ्या…. मिथुन चक्रवर्तींचा मुलगा नमाशी हा लवकरच ‘बॅड बॉय’ या चित्रपटतुन चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. त्याने ETimes शी संभाषणात मिथुन चक्रवर्तींच्या बॉलिवूडमधील सुरुवातीच्या दिवसांचा एक किस्सा शेअर केला आहे. यावेळी त्याने सांगितले की मृगयाच्या यशानंतर त्याचे वडील मिथुन चक्रवर्ती यांनी त्याला राजश्री प्रॉडक्शनच्या ‘तराना’साठी साइन केले. या चित्रपटात त्याची जोडी रंजिता कौरसोबत होती. रोमान्स करण्यात घालवलं तारुण्य अन् नंतर आली लग्नाची आठवण; ‘या’ अभिनेत्रींनी पन्नाशीत थाटला नवा संसार मिथुन यांनी जेव्हा चित्रपट साइन केला होता तेव्हा रंजिता स्टार होती. अशा परिस्थितीत, अभिनेत्रीच्या सोयीसाठी, प्रॉडक्शनने तिला एक कार आणि व्हॅनिटी व्हॅन दिली होती. परंतु मिथुन तेव्हा नवोदित अभिनेते असल्याने त्यांना या सुविधा देण्यात आल्या नाहीत. त्यावेळी त्यांना अजूनही नवख्या कलाकारासारखे वागवले जात होते. नमाशीने सांगितले की, या चित्रपटाचे शूटिंग शिमल्यात सुरू होते. दरम्यान, अमिताभ बच्चनही तिथे मिस्टर नटवरलालचे शूटिंग करत होते.
मिथुन यांच्याकडे तेव्हा गाडी नव्हती. शिमला येथे शूटिंग सुरु असल्याने त्यावेळी त्यांनी टेम्पोमध्ये बसून प्रवास केला. त्याचवेळी अमिताभ यांनी मिथुन यांना टेम्पोमध्ये पाहिलं. याबद्दल नमाशी सांगतात कि, ‘बिग बींनी माझ्या वडिलांना टेम्पोमध्ये प्रॉडक्शनमधील लोक आणि क्रूसोबत बसलेले पाहिले. त्यांना पाहताच बिग बींनी त्यांची कार थांबवली आणि विचारले, ‘आप मिथुन हो ना, मृगया वाले? तुम्ही तेच अभिनेते आहात ना?’ उत्तर देताना माझे वडील म्हणाले, ‘हो बच्चनसाहेब.’ यावर बिग बीनी विचारलं, ‘तुमची कार खराब झाली आहे, तुम्ही टेम्पोमध्ये का प्रवास करत आहात.’ त्यावर मिथुन यांनी ‘माझ्याकडे कार नाही’ असे उत्तर दिले. हे ऐकून अमिताभ यांना चांगलेच आश्चर्य वाटले.
यानंतर अमिताभ यांनी मिथुन यांना त्यांच्या गाडीत बसण्याची विनंती केली. आणि त्यांना त्यांच्या शूटिंगच्या ठिकाणी नेऊन सोडलं. मिथुन यांचा मुलगा नामाशी याविषयी बोलताना म्हणाला कि, ‘एका मोठ्या सुपरस्टारनं त्यांच्या गाडीत लिफ्ट देणं हा एका राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याची सन्मानच होता ज्याला सगळे नवख्या कलाकारासारखं वागवत होते.’ त्या दिवसापासून आजतागायत दोघांची मैत्री कायम आहे. दोघांच्या मैत्रीला आता 45 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.