मुंबई, 30 नोव्हेंबर : सिनेमा म्हणजे समाजाचा आरसा असल्याचं बोललं जातं. पण अनेकदा सिनेमा आपल्याला खऱ्या जगापासून दूर नेताना दिसतात. त्यामुळेच की काय अनेकदा कलाकारांनी काही सिनेमांमध्ये परिधान केलेले काही विशिष्ट कपडे घालण्याबद्दल आपण विचार करत नाही. अनेक सिनेमांमध्ये अजब फॅशनसेन्स पाहायला मिळतो. मात्र काही सिनेमांमध्ये असे ड्रेस वापरले जातात जे घालण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण सिनेमाच्या शूटिंगनंतर कलाकारांनी वापरलेल्या या कपड्यांचं काय होतं याची सर्वांनाच उत्सुकता असते. यशराज फिल्मची स्टायलिस्ट आयशा खन्नानं मिड डेशी बोलताना सांगितलं, सिने कलाकारांनी वापरलेले अनेक कपडे हे बऱ्याच वेळा जपून ठेवले जातात आणि त्यावर त्या सिनेमाच्या नावाचं लेबल लावलं जातं. याशिवाय अनेकदा स्टार कलाकारांनी वापरलेले कपडे तसेच ठेऊन नंतर त्यांना मिक्स मॅच करुन ज्यूनिअर आर्टिस्टना वापरायला दिले जातात. पण या दरम्यान यावर खूपच सतर्क राहून काम केलं जातं जेणेकरून प्रेक्षकांना हे समजू नये की हा ड्रेस यापूर्वी कोणत्या सिनेमात घातला होता. पण सर्वच कपड्यांच्या बाबतीत असं होत नाही. अनेकदा काही खास वेशभूषा स्टार्स त्या सिनेमाची आठवण म्हणून स्वतःकडे ठेऊन घेतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी त्या सिनेमाशी खास भावनिक नातं असल्यानं ते कपडे स्वतःकडे ठेऊन घेतात.
हैदराबाद बलात्कार प्रकरण: बॉलिवूडकरांनी व्यक्त केला संताप
अनेकदा असंही होतं की, जेव्हा एखादा हाय प्रोफाइल सेलिब्रेटी डिझायनर एखाद्या सिनेमासाठी आपले कपडे देतो त्यावेळी तो शूटिंग संपल्यानंतर तो ते पुन्हा परत घेतो. असं देवदास आणि बॉम्बे वेलवेट या सिनेमांच्या बाबतीत घडलं होतं. याशिवाय काही कपड्यांचा लिलाव किंवा दान केलं जातं ज्याद्वारे मिळालेली रक्कम ही एखाद्या चॅरिटीला दिली जाते. रोबोट सिनेमातील ऐश्वर्या राय आणि रजनीकांत यांनी परिधान केलेल्या कपड्यांचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला होता ज्यामधून आलेली रक्कम एका एनजीओला दान करण्यात आली होती.
रॅपर बादशाहने व्यक्त केलं दु:ख, सांगितलं ‘या’ कारणामुळे सोडून गेली गर्लफ्रेंड!
प्रसिध्द टीव्ही अभिनेत्यानं शाळेतच बनवला होता SEX VIDEO, स्वत:चं सांगितला किस्सा