अनुष्का शर्माच्या जवळ येत होता व्यक्ती, भडकला विराट कोहली
मुंबई,25 एप्रिल- सध्या आयपीएलचा धुमधडाका सुरु आहे. चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटर्सना भेटण्यासाठी उत्सुक होत आहेत. अशातच आपल्या लाडक्या क्रिकेटर्सची एक झलक पाहण्यासाठी हव्या त्या गोष्टी करायला तयार आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांच्या वेडेपणाचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. यामध्ये काही खेळाडू शांतपणे सेल्फी, फोटो देऊन निघून जातात. तर काहींसोबत असं काही घडतं की त्यांचा राग अनावर होतो. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा खेळाडू विराट कोहलीसोबत असं काही घडलं की सर्वांना पुन्हा एकदा विराटचा अँग्री लूक पाहायला मिळाला आहे. नुकतंच विराट कोहली आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसून आला. विराट आपली पत्नी-अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कुटुंबासोबत बंगळुरूच्या एका रेस्टोरंटमध्ये पोहोचला होता. याठिकाणी क्रिकेटर्स आल्याची भनक चाहत्यांना लागताच त्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली होती.
विराट आणि अनुष्काची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. दरम्यान एका चाहत्याने असं काही केलं की विराट काहीसा चिडलेला दिसून आला. (हे वाचा: Arijit Singh B’day: आधी लव्ह मॅरेज, एका वर्षातच घटस्फोट, नंतर दुसऱ्यांदा केलं लग्न; अरिजीत सिंगबाबत या गोष्टी तुम्हालाही नसतील ठावूक ) सध्या ट्विटरवर अनुष्का आणि विराटचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, विराट अनुष्काला रेस्टॉरंटमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु चाहते काही केल्यास समोरुन हटण्यास तयार नव्हते. अनुष्काला दरवाजा उघडून आत जाण्यासाठी जागा देण्यासही नकार देत एक व्यक्ती अभिनेत्रीच्या अगदी जवळ आला. हे पाहताच विराटने आपला अँग्री लूक दाखवत त्याला बाजूला केलं. विराट कोहली जितका मजेशीर आणि कूल आहे तितकाच तो रागीट असल्याचं नेहमी म्हटलं जातं. मात्र यावेळी नेटकरी विराट कोहलीला पाठिंबा देत आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे,‘सेलिब्रेटींना थोडीसुद्धा प्रायव्हसी नाहीय. तर काहींनी लिहलंय, ‘कुटुंबासोबत असतानासुद्धा लोक त्यांना एकटं सोडत नाहीत’. तर काहींनी लिहलंय, ‘त्यांच्या खाजगी आयुष्याची थोडी तरी रिस्पेक्ट ठेवा’.
तसेच विराट कोहलीला राग आल्याची ही पहिलीच वेळ नाहीय. याआधीही अनेकांना विराटचा अँग्री लूक पाहायला मिळाला आहे. विराट कोहलीचा समावेश जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटर्समध्ये होतो. तर अनुष्का शर्मा एक प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री आहे. या जोडप्याची प्रचंड मोठी फॅनफॉलोईंग आहे. त्यांना पाहण्यासाठी नेहमीच लोक हवं ते करण्यास तयार असतात.