JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Virat-Anushka: कपाळावर चंदन, गळ्यात माळ... महाकाल मंदिरात पोहोचले अनुष्का-विराट; देवाकडे काय मागितलं?

Virat-Anushka: कपाळावर चंदन, गळ्यात माळ... महाकाल मंदिरात पोहोचले अनुष्का-विराट; देवाकडे काय मागितलं?

Anushka Sharma-Virat Kohali: विराट आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनच्या महाकाल मंदिरात पोहोचला आहे. अभिनेत्री-पत्नी अनुष्का शर्माही त्याच्यासोबत आहे.

जाहिरात

अनुष्का-विराट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 मार्च- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहली ने अद्याप हवी तशी कामगिरी केलेली नाही. इंदूरमधील तिसऱ्या कसोटीत विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण, माजी कर्णधार विराटच्या खेळीने क्रिकेटप्रेमींची निराशा केली आहे. विराट कोहलीने इंदूर कसोटीच्या पहिल्या डावात 22 तर दुसऱ्या डावात 13 धावा काढल्या होत्या. यापूर्वी दिल्ली आणि नागपूर कसोटीतही क्रिकेटरने अशीच निराशाजनक कामगिरी होती. अशा परिस्थिती आता विराट आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनच्या महाकाल मंदिरात पोहोचला आहे. अभिनेत्री-पत्नी अनुष्का शर्मा ही त्याच्यासोबत आहे. विराट आणि अनुष्का सतत विविध मंदिरांना भेटी देत आशीर्वाद घेत असतात. नुकतंच पार पडलेल्या इंदूर कसोटीनंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत महाकाल ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहोचला आहे. कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा भस्मार्तीमध्ये सहभागी झाले होते. यानंतर दोघांनीही मंदिराच्या गर्भगृहात जाऊन पंचामृत पूजन अभिषेक केला. या सेलिब्रेटी कपलचा मंदिरातील व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मंदिराच्या गर्भगृहाबाहेर बसून भोलेनाथाच्या भक्तीत मग्न झालेले दिसत आहेत. व्हिडिओमध्ये विराटने पारंपारिक सोवळा परिधान केलेला दिसत आहे.तर अनुष्काने अगदी सिम्पल अशी साडी नेसली आहे. (हे वाचा: Shahrukh Khan Mannat: शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये दोन तरुणांची घूसखोरी, सुरक्षेत नेमकं कुठे झाली चूक? ) मीडिया रिपोर्ट्सनुसार, भगवान महाकालचे दर्शन घेतल्यानंतर अनुष्का शर्मा म्हणाली की, महाकाल देवाचा आशीर्वाद मिळाल्याने खूप छान वाटत आहे,आणि आम्हाला प्रचंड आनंद झाला आहे. अनुष्का शर्माची धार्मिक बाबींवर प्रचंड श्रद्धा आहे. अभिनेत्री सतत आपल्या क्रिकेटर पतीसोबत विविध धार्मिक स्थळांना भेटी देत आशीर्वाद घेत असते. तिला त्यातून प्रचंड आनंद आणि समाधान मिळतो.

संबंधित बातम्या

काही दिवसांपूर्वी म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बाबा नीम करौली यांच्या आश्रमात पोहोचले होते. त्याठिकाणी बाबांचा आशीर्वाद घेताना आणि भक्तीत रमलेला या जोडप्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. यावेळी त्यांची लेक वामिकासुद्धा त्यांच्यासोबत होती. तसेच हे दोघे वृंदावनात दोन दिवस राहिले होते. यानंतर ते आनंदमाई आश्रमात पोहोचले होते.तेथेही त्यांनी संतांची भेट घेतली होती.

अनुष्का शर्माबाबत सांगायचं झालंतर, अभिनेत्रीने दोन वर्षांपूर्वी मुलगी वामिकाला जन्म दिला आहे. लेकीच्या जन्मानंतर अनुष्का पडद्यावरून गायब झाली होती. परंतु आता अभिनेत्री महिला क्रिकेटर झुलन गोस्वामी यांच्या बायोपिकसोबत वापसी करत आहे. अनुष्का सतत या सिनेमाच्या शूटिंगचे फोटो शेअर करत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या