JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'त्याला सोडणार नाही', NUDE PHOTO व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीने दिला इशारा

'त्याला सोडणार नाही', NUDE PHOTO व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीने दिला इशारा

सध्या देशभरात सध्या देशभरात महिलांच्या सुरक्षेबाबतचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत असतानाच एका अभिनेत्रीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्याची घटना घडली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 डिसेंबर : सध्या देशभरात सध्या देशभरात महिलांच्या सुरक्षेबाबतचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत असतानाच दाक्षिणात्य अभिनेत्री रम्या पंडियनचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. रम्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो खोटे असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र काही दिवसांपूर्वी रम्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले होते. तेच फोटो फोटोशॉप्ड करुन काही अकाउंटवरुन सोशल मीडियावर शेअर केले जात होते. पण आता यावर अभिनेत्री रम्याची यावर प्रतिक्रिया आली आहे. रम्यानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं तिच्या फोटोंसोबत छेडछाड झाल्याची माहिती दिली आहे. तिनं लिहिलं, मला असं समजलं आहे की सोशल मीडियावर माझ्या बद्दल काही चुकीच्या आणि भ्रामक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. ज्यामुळे माझी प्रतिमा मलीन करण्याचं काम होत आहे. मी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छिते की माझं ऑफिशियल ट्विटर हॅन्डल @imramyapanian असून माझं इन्स्टाग्राम अकाउंट @actress_ramyapandian आहे. ‘संजु’च्या 308 गर्लफ्रेंडच्या वक्तव्यावर अभिनेत्रीनं साधला निशाणा, म्हणाली…

रम्यानं तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, ‘जर तुम्हाला माझ्या नावाने कोणी भ्रामक किंवा चुकीची पोस्ट करताना दिसलं किंवा एखादं असं अकाउंट दिसलं जे माझ्याबद्दल चुकीच्या पोस्ट शेअर करत आहे. तर त्याला ट्रॅक करा. मग ती व्यक्ती असो वा एखादी संस्था मी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. ज्यांनी मला ही गोष्ट निदर्शनातस आणून दिली त्यांची मी आभारी आहे.’ फरहान अख्तरची गर्लफ्रेंड म्हणते आतापर्यंत इतकी भीती वाटली नाही, जाणून घ्या कारण

रम्याच्या या पोस्टनंतर अनेक लोक तिला पाठिंबा देताना दिसत आहेत. काही लोकांनी तिला अशा लोकांची नावं सांगण्याचं आश्वासनही दिलं आहे. अशाप्रकारे एखाद्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींच्या बाबतीतही असे प्रकार झाले आहेत. विश्वसुंदरी सुश्मिता सेन वयाच्या 45 व्या वर्षीही अशी राहते फिट!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या