JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रॅप साँगवर अमिताभ बच्चन यांनी केला डान्स, रणवीर सिंह म्हणतो...

रॅप साँगवर अमिताभ बच्चन यांनी केला डान्स, रणवीर सिंह म्हणतो...

प्रसिद्ध रॅपर नॅझीसोबत डान्स करतानाचे बिग बींचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 ऑक्टोबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची एक खास गोष्ट आहे की, ते कोणतही काम करु शकतात. अमिताभ यांनी आतापर्यंत त्यांच्या शानदार अभिनयानं सर्वांची मनं जिंकली आहेत. अभिनयासोबत इतर अनेक गोष्टींमुळे बिग बी चर्चेत असतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे अमिताभ बच्चन यांच्या नावाची खूपच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो एका इव्हेंटमधील असून या फोटोमध्ये प्रसिद्ध रॅपर नॅझीसोबत बिग बी अमिताभ बच्चन डान्स करताना दिसत आहेत. रॅपर नॅझी हा स्वच्छता या विषयावर रॅप गात होता. त्यावेळी अमिताभ यांना त्याच्या रॅपवर डान्स करण्याचा मोह आवरला नाही अमिताभ यांचे डान्स करतानाचे हे फोटो नॅझीनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंवर शेअर केले आहेत. ज्यावर प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अभिनेत्रीला बॉयफ्रेंडनं ठेवलं होतं बाथरुमध्ये कोंडून, Bigg Bossमध्ये केला खुलासा

नॅझीनं अमिताभ बच्चन यांचे डान्स करतानाचे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, ‘फुल हार्ड सीन.’ सोशल मीडियावर या फोटोवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण त्यातही अभिनेता रणवीर सिंहची कमेंट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. रणवीरनं नॅझीच्या फोटोवर कमेंट करताना लिहिलं, ‘बच्चन बोले.’ सुनील शेट्टीची लेक करतेय केएल राहुलला डेट? सोशल मीडियावर PHOTO VIRAL नॅझी हा तोच रॅपर आहे ज्याच्या जीवनावर आधारित गली बॉय या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमात रणवीर सिंहनं नॅझीची रिल लाइफ भूमिका साकारली होती. अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर ते लवकरच अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. VIDEO : शूटिंग दरम्यान हारनेसवर बेशुद्ध झाला कॉमेडियन, अक्षय कुमारनं वाचवला जीव ============================================================= VIDEO : अंग गोठवणाऱ्या थंडीत वर्षभर राहणाऱ्या नवदुर्गेचा अनुभव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या