JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / विकी-कियारा बाथटबमध्ये झाले रोमॅन्टिक; VIDEO पाहून चाहत्यांना आली कतरिनाची आठवण

विकी-कियारा बाथटबमध्ये झाले रोमॅन्टिक; VIDEO पाहून चाहत्यांना आली कतरिनाची आठवण

बॉलिवूडमधील अभिनेता विकी कौशल आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. दुसरीकडे अभिनेत्री कियारा अडवाणीही एकामागोमाग एक हिट चित्रपट देत आपली एक नवी छाप बॉलिवूडवर सोडत आहे.

जाहिरात

विकी कौशल, कियारा अडवाणी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 नोव्हेंबर : बॉलिवूडमधील अभिनेता विकी कौशल आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. दुसरीकडे अभिनेत्री कियारा अडवाणीही एकामागोमाग एक हिट चित्रपट देत आपली एक नवी छाप बॉलिवूडवर सोडत आहे. अशातच बॉलिवूडमधील हे दोन्ही लोकप्रिय कलाकार लवकरच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. दोघेही ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात एकत्र झळकणार असून त्यांच्या चित्रपटातील दुसरं गाणं उद्या 30 नोव्हेंबर रोजी प्रदर्शीत होणार आहे. मात्र या गाण्याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला असून व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटातील नव्या गाण्याचा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही बाथटबमध्ये रोमांस करताना दिसत आहे. कियारा आणि विकीची केमिस्ट्री पाहून तुम्हालाही त्यांच्यावर प्रेम झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र विकीला कियारासोबत रोमॅन्टिक होताना पाहून कतरिनाच्या चाहत्यांनी त्याला चिडवायला सुरुवात केली. याविषयी चाहते पोस्टवर कमेंट करत आहेत. गाण्याच्या टीझरवरुन गाण्याची उत्सुकता आणखीनच वाढली असून चाहते गाणं प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

संबंधित बातम्या

‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटातील शराबी या गाण्याला जुबिन नौटियालने आवाज दिला आहे. तर तनिष्क बागचीने संगीत दिले आहे. विकी-कियाराचं हे रोमँटिक गाणं 30 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. सध्या गाण्याच्या टीझरमुळे इंटरनेटचं वातावरण तापलं आहे आणि सोशल मीडियावर गाण्याची जोरदार चर्चा पहायला मिळतेय. हेही वाचा -  Shruti Hassan: विखुरलेले केस, थकलेली आजारी श्रृती हसन; अभिनेत्रीला नक्की झालंय काय? दरम्यान, विकी कौशलसोबत ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 16 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात विकी कौशल खूप डान्स करताना दिसणार आहे. चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.

विकी कौशलचा आगामी चित्रपट ‘गोविंदा नाम मेरा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो बॅग्राउंड डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या त्याच्या या चित्रपटाती चांगलीच चर्चा आहे. चित्रपटातील पहिलं गाणं ‘बिजली बिजली’ नुकतंच प्रदर्शित झालं. हे गाणं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. यामधील कियारा आणि विकीचा हटके अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्याचं प्रेक्षकांकडून भरभरुन कौतुकही झालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या