JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Ved Movie: 'वेड' चित्रपटात होणार 'हा' बदल; लाईव्ह येत रितेश देशमुखचा मोठा खुलासा

Ved Movie: 'वेड' चित्रपटात होणार 'हा' बदल; लाईव्ह येत रितेश देशमुखचा मोठा खुलासा

बॉक्स ऑफिसवर वेडनं रेकॉर्ड ब्रेक कमाई करत असताना रितेशने चित्रपटाविषयी अजून एक मोठी घोषणा केली आहे.

जाहिरात

वेड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जानेवारी: रितेश आणि जिनिलियाच्या वेड चित्रपटाची सगळ्यांनाच भुरळ पडली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटापुढे  बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांचीही अवस्था वाईट झाली आहे. भलेभले बिग बजेट सिनेमे सध्या फ्लॉप होत असून रितेश आणि जिनिलियाची जोडी मात्र हिट झाली आहे. सध्या सगळीकडे रितेशचं कौतुक होत आहे. मध्यंतरी रितेशने चित्रपटाविषयी मोठी घोषणा केली होती. या चित्रपटानंतर सत्या आणि श्रावणीची लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता त्यानंतर रितेशने अजून एक मोठी घोषणा केली आहे. ‘वेड’ मुळे मराठी चित्रपटासाठी नव्या वर्षाची सुरुवात धुमधडाक्यात झाली आहे. ‘वेड’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून उत्तम कामगिरी करताना दिसतोय. बॉक्स ऑफिसवर वेडनं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत त्यानं सर्वांना वेड लावलंय असं म्हणायला हरकत नाही. आता रितेशचं सगळीकडेच कौतुक होत असताना रितेशने पुन्हा मोठी घोषणा केली आहे. रितेशने एका नव्या गाण्यासोबतच सत्या आणि श्रावणीचे रोमँटिक क्षण आता सिनेमात पाहायला मिळतील असं सांगितलं आहे. हेही वाचा - Ved Box Office Collection: ‘सैराट’ला मागे टाकणार ‘वेड’? बॉक्स ऑफिस कमाईचा नवा आकडा थक्क करणारा त्याचसोबत सलमान खान असलेलं ‘वेड लावलंय’ हे गाणं आधी चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आलं होतं. आता प्रेक्षकांच्या आग्रहास्तव हे गाणं  चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

रितेशने यावेळी लाईव्ह येत सांगितलं कि, ‘बरेच जण मागणी करत होते कि सत्या आन श्रावणी त्यांचं जीवन पुढे कसं जगतात हे आम्हाला पाहायचंय. पण काही कारणास्तव आम्हाला ते अद्धि चित्रपटात दाखवण्यात आलं नाही. आता सिनेमा रिलीज होऊन दोन आठवडे झाले असले तरी आम्ही पुन्हा शूट करून ‘वेड तुझे’ हे गाणं चित्रपटात टाकलं आहे. तसेच सलमान भाऊंनी डान्स केलेला ‘वेड लावलंय’ हे गाणं देखील चित्रपटामध्ये पाहायची संधी तुम्हाला मिळणार आहे. चित्रपटाचं हे नवं व्हर्जन 20 तारखेपासून तुम्ही चित्रपटगृहात पाहू शकता.’ अशी घोषणा करत रितेशने प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहेत.

दरम्यान आता चित्रपटाचा नवा बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्ट्स समोर आला आहे. नव्या रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने रिलीजच्या 18 व्या दिवशी 1.4कोटींची कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने एकूण तब्बल 48 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर एक नवा रेकॉर्ड केला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या