मुंबई, 29 फेब्रुवारी : अभिनेता वरुण धवन नेहमीच पॅपराजीसोबतच्या फ्रेंडली नेचरसाठी ओळखला जातो. याशिवाय त्याचं चाहत्यांशी वर्तनही नेहमीच चांगलं असतं त्यामुळे या सर्वांमध्ये त्याची एक वेगळी इमेज तयार झाली आहे. पण नुकतच वरुणचा फोटो घेण्यासाठी आलेल्या एका फोटोग्राफरच्या पायावरून वरुण धवनची कार गेल्याची घटना घडली. त्यानंतर वरुण जे केलं ते पाहण्यासारखं होतं. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. वरुण धवननं नुकतीच दिग्दर्शक शशांक खेतानच्या बर्थ डे पार्टीमध्ये हजेरी लावली. त्यावेळी एका फोटोग्राफरचा पाय चुकून वरुणच्या गाडीखाली आला. यानंतर तिथं गर्दी जमा झाली. वरुणनं जेव्हा हे पाहिलं त्यावेळी त्यानं स्वतः जाऊन त्या फोटोग्राफरची भेट घेतली. त्याची विचारपूस केली. यानंतर सर्व फोटोग्राफर्सना समजावताना वरुण म्हणाला, ‘मी तुम्हाला कधी फोटोसाठी नाही म्हटलंय असं कधी झालं आहे का? तुम्ही असं का वागता? निघताना मी तुमच्याकडे येतोच ना? मग तुम्ही असं घाईघाई का करता? मी नेहमीच तुम्हाला फोटो देतो ना.’ पार्टी करून परतत होती जान्हवी; फोटोग्राफर म्हणाला, ‘आप कहो तो घर तक भी आएंगे’
या घटनेनंतर वरुण वारंवार त्या फोटोग्राफरची चौकशी करत राहिला. जेव्हा सर्व फोटोग्राफर्सनी त्याला सांगितलं त्याला जास्त लागलेलं नाही आणि आता तो ठिक आहे तेव्हाच वरुण तिथून निघाला. वरुणच्या या कृतीनं सर्वांची मनं जिंकली. ही घटना घडली तेव्हा वरुण सोबत त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल सुद्धा होती. घटस्फोटानंतर आता असं आयुष्य जगतायत बॉलिवूडच्या सुपरहिट अभिनेत्री
वरुणच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचं तर लवकरच तो ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या सिनेमात तो पहिल्यांदाच अभिनेत्री सारा अली खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन वरुणचे वडील डेव्हिड धवन यांनी केलं आहे. या सिनेमाचा फर्स्ट लुक समोर आला आहे ज्यातील सारा-वरुणची फ्रेश केमिस्ट्री लोकांच्या पसंतीस उतरली आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉडी शेमिंगवरुन ट्रोल करणाऱ्यांना श्रुती हसननं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली…