JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bhedia Trailer Out: वरुण धवन-क्रिती सॅनन च्या 'भेडिया'चा रोमांचकारी ट्रेलर रिलीज; पाहून अंगावर येईल शहारा

Bhedia Trailer Out: वरुण धवन-क्रिती सॅनन च्या 'भेडिया'चा रोमांचकारी ट्रेलर रिलीज; पाहून अंगावर येईल शहारा

वरुण धवन आणि क्रिती सेनन स्टारर ‘भेडिया’ चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. चित्रपटाच्या पोस्टर्सने जबरदस्त सस्पेन्स निर्माण केला होता आता त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

जाहिरात

'भेडिया' ट्रेलर रिलीज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 ऑक्टोबर :वरुण धवन आणि क्रिती सेनन स्टारर ‘भेडिया’ चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एक वेगळा प्रयोग करण्यात येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहून चाहत्याना उत्सुकता निर्माण झाली होती. आता  या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘स्त्री’ आणि ‘बाला’ सारखे सिनेमे बनवणाऱ्या अमर कौशिकने चित्रपटाच्या पोस्टर्सने जबरदस्त सस्पेन्स निर्माण केला होता, जो ट्रेलर पाहिल्यानंतर वाढला आहे. चित्रपटात व्हीएफएक्सचा जबरदस्त वापर करण्यात आला आहे, जो ट्रेलरमध्ये दिसत आहे. या चित्रपटातील केवळ वरुणच नाही तर क्रितीची शैलीही तिच्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांपेक्षा वेगळी आहे. ‘भेडिया’च्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच वरूण धवनच्या आत लांडग्याचा आत्मा आल्याचं पाहायला मिळत आहे. वरुणचे डोळे आणि ज्वाला रात्रीच्या अंधारात जंगलात पौराणिक लांडग्याची झलक दाखवतात. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये व्हीएफएक्सचा उत्तम वापर करून सस्पेन्स आणि थ्रिलर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ट्रेलरमुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हेही वाचा - Rhea Chakraborty : सुशांतची गर्लफ्रेंड रियाने तुरुंगात कैद्यांसोबत केलं होतं असं काही; सगळीकडे होतेय चर्चा ‘भेडिया’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरपूर्वी दोन पोस्टर्सनी या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्याचे काम केले होते. सोमवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमधील वरुणचा लूक आणि मंगळवारी क्रितीच्या ओघवत्या शैलीने उत्सुकता वाढवली, जी ट्रेलर पाहिल्यानंतर अजून वाढली आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच अमर कौशिक दिग्दर्शित ‘भेडिया’ या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

संबंधित बातम्या

वरुण धवन गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या ‘भेडिया’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिनेश विजन निर्मित या चित्रपटात वरुण एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत क्रिती पुन्हा एकदा दिसणार आहे. याआधी दोघेही ‘दिलवाले’ चित्रपटात एकत्र दिसले होते. 25 नोव्हेंबरला ‘भेडिया’ 2D आणि 3D अशा दोन्ही प्रकारात रिलीज होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या