अक्षया-हार्दीक
मुंबई, 14 फेब्रुवारी- ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धीस आलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी होय. या दोघांची पडद्यावरील केमिस्ट्री लोकांना प्रचंड पसंत पडली होती. या मालिकेमुळे राणा-अंजली ही जोडी घराघरात पोहोचली होती. दोघांनाही एकत्र पाहणं प्रेक्षकांना प्रचंड आवडत होतं. अशातच या दोघांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. हे जोडपं आज आपला लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाइन्स डे साजरा करत आहेत. नुकतंच अक्षयाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपला एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. आज सर्वत्र व्हॅलेंटाइन्स डे साजरा केला जात आहे. सगळीकडे प्रेमाचं वारं वाहताना दिसून येत आहे. काही लोक आज आपला पहिला व्हॅलेंटाइन्स डे साजरा करत आहेत तर काही लोक अनेक वर्षांपासून हळुवारपणे एकमेकांना सांभाळून घेत त्या व्यक्तीसोबत आपला व्हॅलेंटाइन डे साजरा करत आहेत. मराठी सेलिब्रेटी कपल अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी लग्नानंतरचा आपला पहिला व्हॅलेंटाइन्स डे साजरा करत आहेत. नुकतंच अक्षयाने हार्दिकसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. (हे वाचा: Valentines Day 2023: मुंबईच्या ब्रिजवर भर गर्दीत बसून मराठमोळ्या अंकुशने दीपाला केललं प्रपोज; या दोघांची LOVE STORY तुम्हालाही पाडेल प्रेमात ) अक्षया देवधरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पती हार्दिकसोबत रोमँटिक झालेली दिसून येत आहे. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले पाहायला मिळत आहेत. या दोघांनी आपल्या हातात गुलाबाचं फुलसुद्धा धरलं आहे. हा फोटो अंधारात क्लिक करण्यात आला आहे. यामध्ये दोघांचा चेहरा फक्त दिसून येत आहे.त्यामुळे हा फोटो आणखीनच आकर्षक दिसत आहे. अक्षयाने फोटो शेअर करत एक सुंदर शायरीसुद्धा लिहली आहे, ‘मेरे बस में नहीं अब हाल-ए-दिल बयां करना बस ये समझ लो, लफ्ज कम मोहब्बत ज्यादा!’. असं म्हणत अक्षयाने आपल्या मन की बात सांगितली आहे.
झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या निमित्ताने अक्षया आणि हार्दिक भेटले होते. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. यामधील राणा-अंजलीची केमिस्ट्री आणि त्यांचे डायलॉग्स लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. मालिकेमध्ये हार्दिकने कोल्हापूरच्या रांगड्या पैलवानाची भूमिका साकारली होती. तर अंजलीने एका शहरातील व्यवसायाने शिक्षक असणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती.
गेल्यावर्षी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर या दोघांनी साखरपुडा करत सर्वांनाच चकित केलं होतं. साखरपुड्याच्या काही दिवसांनंतरच दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. या दोघांची जोडी प्रचंड पसंत केली जात आहे. दोघांच्या लग्नाचे फोटोसुद्धा सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले होते.