कपिल शर्मा
मुंबई, 10 फेब्रुवारी- प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा चं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. कपिल शर्मा आपल्या गाण्यात रोमान्स करताना आणि हार्टब्रेकची व्यथा सांगताना दिसत आहे. कॉमेडीयचं हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहमी विनोदी स्वभावाने लोकांना खळखळून हसवणाऱ्या कपिलचा रोमँटिक अंदाज पाहून चाहते अवाक झाले आहेत. कॉमेडियनच्या या गाण्यावर चाहते भरभरुन कमेंट्स देत आहेत. दरम्यान या गाण्याला रिलीजच्या अवघ्या काही तासांत भरघोस व्ह्यूज मिळाले आहेत. कॉमेडियन-अभिनेता कपिल शर्मा आपल्या कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा’ मध्ये हजरजबाबीपणा आणि क्विक कॉमिक टाइमिंगने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतो. या शोमध्ये कपिल अनेकदा माइक घेऊन गाणी गाताना दिसतो. कपिलने अनेकदा सांगितले आहे की, त्याला गायक व्हायचं होतं. आता कपिलच्या मनातील इच्छा पूर्ण झाली आहे. कपिलचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. (हे वाचा: Kajol News: ‘इतकी गोरी कशी झालीस?’, म्हणणाऱ्यांना अखेर काजोलने सांगितलं आपलं सिक्रेट ) या गाण्यात कपिल शर्मा आणि गुरू रंधवाची जुगलबंदी चाहत्यांना प्रचंड पसंत पडत आहे. कपिल सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी अभिनेत्री योगिता बिहानीच्या प्रेमात पडताना, बाईक चालवताना, अभिनेत्रीला अंगठी घालून लग्नाची मागणी घालताना आणि नंतर आपलं मन कसं तुटलं याची कहाणी सांगताना दिसून येत आहे.
या गाण्याचं शूटिंग बर्फाळ भागात करण्यात आलं आहे. या गाण्यात कपिल रोमान्समध्ये मग्न झालेल्या प्रियकराच्या रुपात दिसत आहे. कपिल आणि गुरु रंधवाचं हे इमोशनल गाणं ऐकल्यानंतर चाहते म्हणत आहेत की, कपिल हा केवळ कॉमेडीयनच नव्हे तर तो एक उत्तम गायकही आहे. त्याचबरोबर गुरु रंधवाच्या मनाला भिडणाऱ्या दमदार आवाजाचंही प्रचंड खूप कौतुक केलं जात आहे. कपिलच्या या डेब्यू गाण्यासाठी चाहते त्याचं अभिनंदन करत आहेत.
व्हॅलेंनटाईन्स डेच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेलं हे गाणं प्रचंड चर्चेत आलं आहे. कपिल आणि गुरु रंधावाच्या जुगलबंदीला अफाट प्रतिसाद मिळत आहे. रिलीज होऊन अवघे काही तास उलटले असताना या गाण्याला १७ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कपिल शर्माचं गायन क्षेत्रात हे दमदार पाऊल म्हटलं जात आहे.