JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मराठी अभिनेत्यानं घातली फाटकी जीन्स, आजीने झाप झाप झापलं; VIDEO VIRAL

मराठी अभिनेत्यानं घातली फाटकी जीन्स, आजीने झाप झाप झापलं; VIDEO VIRAL

फाटलेली जीन्स घातल्यानं एका मराठमोळ्या अभिनेत्याला आजीचा चांगलाच ओरडा खावा लागला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 जानेवारी: फॅशन विश्वात दरवर्षी नवा ट्रेंड येतात आणि जातात. पण काही फॅशन ट्रेंड असेही असतात. जे बरीच वर्ष टिकून राहतात. फाटलेल्या जीन्सची फॅशन त्यापैकीच एक. काही वर्षांपूर्वी आलेली ही फॅशन अद्याप ट्रेंडमध्ये आहे. पण अशी फाटकी जीन्स घातल्यानं एका मराठमोळ्या अभिनेत्याला आजीचा चांगलाच ओरडा खावा लागला. या अभिनेत्याला त्याच्या आजीन अक्षरशः झापलं. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा धम्माल किस्सा घडला आहे मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादीसोबत. वैभवनं त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये फाटलेली जीन्स घातली म्हणून त्याची आजी त्याला ओरडताना दिसत आहे. इतकंच नाही तर तू जे हे घातलं आहेत ते तुला शोभतं का असंही आजी वैभवला विचारताना दिसत आहे. तसेच माणसानं चांगले कपडे घालावे रे तुला कोणी यावरुन काही बोललं नाही का? काय हे फाटलेले कपडे घातलेस असं विचारताना दिसत आहे. VIDEO : एकता कपूरनं केली Naagin 5 ची घोषणा, पाण्यात घेतली ऑडिशन

आजी आणि नातवाच्या प्रेमळ नात्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. वैभव सुद्धा आजीचं हे बोलणं एन्जॉय करताना दिसत आहे. त्यानं हा मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना लिहिलं, माझ्या आजीला मी अशी फाटलेली जीन्स घातलेली अजिबात आवडलेली नाही. त्यानंतर वैभवनं आजीसोबतचा आणखी एक फोटो शेअर केला या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, फक्त एक टोर्न जीन्स माझ्याकडे होती जी आता लादी पुसण्यासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे आजी खूप खूश आहे. सुहाना खानचं अलिबागमध्ये जोरदार New Year सेलिब्रेशन, पाहा VIRAL PHOTO

वैभवच्या सिनेमांबद्दल बोलायचं तर त्यानं ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘भेटली तू पुन्हा’, ‘चिटर’, ‘मिस्टर आणि मिसेस सदाचारी’ अशा बऱ्याच मराठी सिनेमात काम केलं आहे. याशिवाय ‘बाजीराव मस्तानी’ या बॉलिवूड सिनेमातही तो चिमाजी आप्पा यांच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या या भूमिकेच कौतुकही झालं. शिल्पानं न्यू ईयरला मागितलं असं गिफ्ट, ऐकल्यावर नवरा झाला बेशुद्ध

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या