JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Urvashi Rautela : ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशीची Emotional Post; तो फोटो शेअर करत म्हणाली…

Urvashi Rautela : ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशीची Emotional Post; तो फोटो शेअर करत म्हणाली…

भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठी शुक्रवारी सकाळी एक वाईट बातमी समोर आली आहे. ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाला.

जाहिरात

उर्वशी रौतेला, ऋषभ पंत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 डिसेंबर : भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठी शुक्रवारी सकाळी एक वाईट बातमी समोर आली आहे.  ऋषभ पंत च्या गाडीचा भीषण अपघात झाला. या बातमीने सर्वत्र एकच खळबळ उडालेली पहायला मिळाली. क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडहून दिल्लीला जात होता. अचानक कारचा ताबा सुटला आणि गाडी डिव्हायडरला धडकली. या अपघातामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका गंभीर होता की यात पंतची कारदेखील जळून खाक झाली आहे. एकीकडे ऋषभ पंतच्या अपघातावर सगळेजण हळहळ व्यक्त करत आहेत तोच दुसरीकडे अभिनेत्री उर्वशी रौतेला ट्रोल होत आहे. ऋषभ पंतच्या अपघातानंतर काही वेळातच उर्वशी रौतेलाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडीयावर चर्चेचा विषय बनला आहे. भीषण अपघातानंतर ती ऋषभ पंतला लवकर बरे होण्याचा संदेश देईल अशी अपेक्षा होती आणि तेच घडले. उर्वशीने स्वतःचा एक फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे, ‘प्रार्थना’. उर्वशीची ही पोस्ट आणि तिचं कॅप्शन सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

उर्वशीच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहे. अनेकजण तिच्या कॅप्शवरुन तिला बोलत आहेत तर काहीजण फोटोवरुन तिला ट्रोल करत आहेत. अरे फोटो काय अपलोड करतेय तिकडे ऋषभ भावाचा अपघात झालाय, सगळे फोटो बघताय कोणी कॅप्शन पण बघा, कॅप्शमधून दिसतंय तिचं प्रेम, तुझ्या जीवाला आता थंडक मिळाली, अशा अनेक प्रतिक्रिया उर्वशीच्या पोस्टवर येत आहेत.

दरम्यान, उत्तराखंडमधल्या रुरकीजवळ पहाटे 5.15 वाजता हा अपघात झाला आहे. पंतच्या डोक्याला आणि पाठीला प्रचंड दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. एवढंच नाही तर त्याला पुढील उपचारासाठी देहरादूनला हलवण्यात आलं आहे. त्याच्या अपघाचानं टीम इंडियाला मोठा धक्का बसला असून चाहतेही सदम्यात आहेत. तो लवकर बरा व्हावा म्हणून सगळेजण प्रार्थना करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या