मुंबई, 4 एप्रिल- स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’. ही मालिका २ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका हिंदी मालिकेचा मराठी रिमेक आहे. या मालिकेत महेश कोठारे यांच्या सूनबाई म्हणजे अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत उर्मिला कोठारे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र याबद्दल अधिकृत अशी कोणतीच माहिती समोर आलेली नाही. या नवीन मालिकेचा प्रोमो देखील नुकातच भेटीला आला आहे. वाचा- अरुंधती सर्वोत्कृष्ट आई तर संजनाने पटकावला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार! स्टार प्लसवरील ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या मालिकेचा ‘तुझेच मी गीत गात आहे’ हा मराठी रिमेक असणार आहे. . मुळात ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ हा शो बंगाली मालिकेचा रिमेक होता. त्याच्या हिंदी रिमेकला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मराठी रिमेक स्टार प्रवाह घेऊन येत आहे. ही मालिका रात्री 9 वाजता प्रसारीत होणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, मुलगी झाली हो (Mulgi Jhali Ho )मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी ही नवीन मालिका पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक या नवीन मालिकेला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
अभिनेत्री उर्मिला कोठारे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे डान्स व्हिडिओ असतील किंवा मुलीसोबतचे व्हिडिओ देखील ती शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी उर्मिला सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती. तिने या मालिकेत परिक्षकाची भूमिका साकारली होती. तिनं अनेक मराठी मालिका व सिनेमामध्ये अभियनयाचा ठसा उमठविला आहे. पुन्हा ती छोट्या पडद्याकडे वळली आहे. आता पुन्हा दिला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.