JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Urfi Javed: ड्रेस सोडा उर्फीच्या नेकलेसची होतेय तुफान चर्चा, गळ्यात अडकवलं असं काही पुन्हा-पुन्हा पाहिला जातोय VIDEO

Urfi Javed: ड्रेस सोडा उर्फीच्या नेकलेसची होतेय तुफान चर्चा, गळ्यात अडकवलं असं काही पुन्हा-पुन्हा पाहिला जातोय VIDEO

Urfi Javed Look: उर्फी जावेद हे नाव आता कोणालाही नवं राहिलेलं नाही. ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद नेहमीच आपल्या अतरंगी फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असते.

जाहिरात

उर्फी जावेदच्या गळ्यातील नेकलेसची होतेय चर्चा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 एप्रिल- उर्फी जावेद हे नाव आता कोणालाही नवं राहिलेलं नाही. ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद नेहमीच आपल्या अतरंगी फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असते. उर्फी कधी कोणत्या गोष्टीपासून आपला ड्रेस बनवेल याचा काही नेम नसतो. काचा, वायर, कागद या सर्वांपासून बनलेले ड्रेस उर्फीने परिधान केले आहेत. आपल्या या ग्लॅमरस लूकमुळे उर्फी सतत वादातसुद्धा सापडत असते. तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलदेखील केलं जातं. मात्र उर्फीवर या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही.उर्फी नेहमीच स्वतः च्या मतांवर ठाम असते. आता उर्फी जावेद आपल्या गळ्यातील नेकलेसमुळे चर्चेत आली आहे. उर्फी जावेद करण जोहरच्या ‘बिग बॉस ओटीटी’ या कार्यक्रमामध्ये झळकली होती. मात्र या कार्यक्रमातून पहिल्याच आठवड्यात ती बाहेर पडली होती. पण आपल्या कामापेक्षा जास्त उर्फी आपल्या फॅशन आणि स्टाईलमुळे चर्चेत असते.

उर्फी असे असे ड्रेस डिझाईन करुन परिधान करत की पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. उर्फी आपल्या बोल्डनेसमुळे सतत टीकेला सामोरी जात असते. मात्र या सर्वांना ती रोखठोक उत्तरेसुद्धा देत असते. नुकतंच उर्फी जावेद एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. यामध्ये ती न्यासा देवगन आणि जान्हवी कपूर यांचा खास मित्र असणाऱ्या ऑरीसोबत दिसून आली होती. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ऑरीला पाहताच उर्फीने त्याला कडकडून मिठी मारत त्याची भेट घेतली शिवाय मीडियाला पोझसुद्धा दिल्या. (हे वाचा: सैफच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे श्वेता तिवारीची लेक? पहिल्यांदाच इब्राहिमसोबतच्या नात्यावर उघडपणे बोलली पलक ) या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी उर्फीने काळ्या रंगाचा हायस्लिट गाऊन परिधान केला होता. ब्रालेट गाऊनमध्ये उर्फी नेहमीप्रमाणेच अतिशय ग्लॅमरस दिसत होती. पण यावेळी उर्फीच्या ड्रेसपेक्षा जास्त तिच्या गळ्यातील नेकलेसची चर्चा होत होती. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की उर्फीने असं काय गळ्यात घातलं आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, उर्फीने गळ्यात पाल अडकवली होती. घाबरु नका अभिनेत्रीने खरी पाल नव्हे तर पालीचं नेकलेस गळ्यात घातलं होतं. या हटके नेकलेसने सर्वांनाचंच लक्ष वेधून घेतलं होतं.

संबंधित बातम्या

मीडियासमोर पोझ देताना फोटोग्राफर्सनी उर्फीसोबत माजमस्ती करत नेकलेसबाबत विचारणाकेली . काहींनी गळ्यात पाल अडकवल्याचं म्हटलं. यावर उर्फी आणि ऑरीने हसत प्रतिसाद दिला. तर ऑरीने हो गळ्यात पाल असल्याचं सांगत मजेशीर संवाद साधला. उर्फीच्या या नेकलेसची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या