उर्फी जावेद
मुंबई, 08 जानेवारी: उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ यांनी आवाज उठवला. त्यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि न्युडिटी पसरवल्याबद्दल अटकेची मागणी केली. त्यानंतर या दोघींचं ट्विटर वॉर चांगलंच रंगलं. एवढंच नाही तर उर्फी विरोधात चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे निवेदन दिलं. आता उर्फी पुन्हा एकदा चर्चेतआली आहे. मात्र यावेळी चर्चेत येण्याचं कारण तिचा हटके ड्रेस नसून वेगळंच आहे. उर्फीनं नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. उर्फीनं गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं नेहमीप्रमाणंच अतरंगी असं कॅप्शन दिलं आहे. हेही वाचा - Urfi Javed Video: उर्फीने पूर्ण केली चित्रा वाघ यांची इच्छा; स्वतःच हातात ठोकून घेतल्या बेड्या उर्फी नुकतीच लोकप्रिय गीताकर जावेद अख्तर यांना भेटली. या भेटीचा फोटोही तिनं चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत उर्फी जावेद अख्तर यांच्या बाजूला बसल्याचं पाहायला मिळत आहे. तर फोटोला कॅप्शन देताना उर्फीनं म्हटलं आहे की, ‘फायनली मी माझ्या आजोबांना भेटले’.उर्फीचं हे कॅप्शन वाचून अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उर्फी जावेद नुकतीच एका फॅशन शोच्या निमित्ताने दिल्लीत आली होती, जिथे तिची जावेद अख्तरशी भेट झाली. या भेटीचा फोटोही तिनं चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत उर्फी जावेद अख्तर यांच्या बाजूला बसल्याचं पाहायला मिळत आहे. तर फोटोला कॅप्शन देताना उर्फीनं म्हटलं आहे की, ‘फायनली मी माझ्या आजोबांना भेटले’.उर्फीचं हे कॅप्शन वाचून अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे.
सुरुवातील उर्फी जावेद ही जावेद अख्तर यांची नात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर तिनं अनेकदा भाष्य केलं होतं. सतत तिला मी जावेद अख्तर यांची नात नसल्याचं सांगावं लागत होतं. त्यामुळं गंमत म्हणून आता तिनं हे कॅप्शन लिहिलंय. ‘अखेर मी माझ्या आजोबांना भेटलेच’, असं तिनं म्हटलंय. उर्फी जावेद तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे टीकेची शिकार होत आहे. ट्रोल्सची पर्वा न करता उर्फी प्रत्येक वेळी तिच्या नवीन शैलीने लोकांना आश्चर्यचकित करते. कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राजकारण्यांवर निशाणा साधत, राजकारण्यांना काही काम नाही का, असा सवाल उर्फीने केला आहे. आता उर्फीचा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.