उर्फी जावेद चित्रा वाघ
मुंबई, 09 जानेवारी : अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरण सध्या चांगलंच चिघळताना दिसत आहे. उर्फी विरुद्ध चित्रा वाघ असा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या विचित्र फॅशन स्टाइलवर आक्षेप घेत हिला ताबडतोब बेड्या ठोका असं म्हणत थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात चांगलाच ट्विटर वॉर सुरू आहे. हे ट्विटर वॉर पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. उर्फीनं पुन्हा एकदा चित्रा वाघांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. चित्रा वाघांना उद्देशून उर्फीनं केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. आधी आपण मैत्रिणी होऊ असं म्हटल्यानंतर उर्फीनं चित्रा वाघांना थेट आपली सासू म्हटलंय. चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर उर्फी जावेद सध्या ट्विटच्या माध्यमातून उत्तर देताना दिसतेय. उर्फीनं यावेळी ट्विट करत म्हटलंय, ‘मेरी डिपी इतनी ठासू, चित्रा वाघ मेरी सासू’. या ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
हेही वाचा - Urfi javed on Chitra Wagh : ‘आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss’; उर्फी जावेद पुन्हा वाघांच्या वाटेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत मुंबई पोलिसांत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्याचप्रमाणे मोर्चा देखील काढला. चित्रा वाघांच्या तक्रारी नंतर उर्फीनं ट्विट करत चित्रा वाघांवर निशाणा साधला. तुमच्यसारखे राजकारणी माझा वापर करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याकडे तुम्ही का लक्ष देत नाही असा सवाल केला. त्याचप्रमाणे हे प्रकरण थोड शांत होण्याच्या वाटेवर असताना उर्फीनं चित्रा वाघांना डिवचून पुन्हा ट्विट करत म्हटलं होतं की आपणं लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूssss. उर्फीच्या या ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तसंच उर्फीनं म्हटलं, मी भाजप जॉईन केल्यानंतर आपण कधी मैत्रिणी होतोय याची म वाट पाहत आहे. तसंच तिनं संजय राठोड यांच्या जुन्या प्रकरणाची आठवण करून दिली होती. तुम्ही भाजपमध्ये गेल्यानंतर तुम्ही मित्र मैत्रिणी झाला असाल जेणेकरून तुम्ही त्यांच्या सगळ्या चुका विसरल्या आहेत ज्यासाठी NCPमध्ये इतका गदारोळ झाला होता.