JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Urfi Javed Birthday: कोट्यावधींची मालकीण आहे उर्फी, महिन्याला कमावते इतके लाख रुपये

Urfi Javed Birthday: कोट्यावधींची मालकीण आहे उर्फी, महिन्याला कमावते इतके लाख रुपये

आज उर्फी जावेदचा वाढदिवस असून ती 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे आज उर्फीवर भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उर्फीच्या खास दिवशी तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

जाहिरात

उर्फी जावेद

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 ऑक्टोबर : बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्सबद्दल नेहमीच चर्चेत असते. ती  तिच्या असामान्य फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. अतरंगी आउटफिट्स आणि बोल्डनेसमुळे उर्फी रोज चर्चेच्या केंद्रस्थानी असते. अशातच आज उर्फी जावेदचा वाढदिवस असून ती 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे आज उर्फीवर भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उर्फीच्या खास दिवशी तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया. उर्फी जावेदने दुर्गा, सात फेरे की हेरा फेरी, बेपन्ना, जीजी माँ, दयान, ये रिश्ता क्या कहलाता है आणि कसौटी जिंदगी काय यांसारख्या मालिकांमध्येही काम केले आहे. मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती बिग बॉस ओटीटीमुळे. बिग बॉसमुळे उर्फीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. याशिवाय तिचा चाहतावर्गही वाढला. हेही वाचा -  आता तर हद्दच झाली! Urfi Javed ने यावेळी कपड्यांऐवजी…, पाहा NEW LOOK उर्फी जावेद अतिशय आलिशान आयुष्य जगते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की उर्फी करोडोंच्या संपत्तीची मालक आहे आणि ती दर महिन्याला लाखोंमध्ये कमावते. उर्फी सीरियलच्या एका एपिसोडसाठी 25 ते 30 हजार रुपये घेते आणि ती दरमहा 30 लाख रुपये कमवते. त्यांची एकूण संपत्ती 172 कोटी इतकी आहे. उर्फी अभिनय, मॉडेलिंग आणि जाहिरातींमधून चांगली कमाई करते. उर्फी जावेद फी ब्रँड एंडोर्समेंटसाठी भरीव फी आकारते.

संबंधित बातम्या

उर्फीचा जन्म लखनौमध्ये झाला होता पण आता ती मुंबईत एका आलिशान फ्लॅटमध्ये राहते. तिच्याकडे जीप कंपास एसयूव्ही कार आहे, ज्याची किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे. उर्फी या कारसोबत अनेकदा स्पॉट केली जाते.

दरम्यान, उर्फी सध्या तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘हाय ही ये मजबुरी’ या गाण्यामुळे चर्चेत आहे. उर्फी जावेदचे हे गाणे 1974 मध्ये रिलीज झालेल्या ‘रोटी, कपडा और मकान’ या चित्रपटातील गाण्याचे रिक्रिएशन आहे. या नवीन गाण्यात श्रुती राणेने तिचा आवाज दिला असून राजेश मंथन यांचे बोल आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या