उर्फी जावेद चित्रा वाघ
मुंबई, 31 डिसेंबर : सोशल मीडिया इन्स्फ्ल्युएन्सर आणि आपल्या विचित्र फॅशन स्टाइलनं कायम चर्चेत असलेल्या उर्फी जावेदवर भाजपनं टीका केली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीला बेड्या ठोका अशी मागणी केली आहे. उर्फीच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी उर्फीवर चांगलीच टीका केला. आजवर उर्फीवर अनेकांची टीका केली. अनेकांनी तिला खडसावलं आहे. मात्र प्रत्येकाला तिनं उत्तर देत त्यांची तोंड बंद केल्याचं पाहायला मिळालं आहे. आता चित्रा वाघांच्या टीकेला देखील उर्फीनं उत्तर देत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. उर्फीनं चित्र वाघ यांनी टिका केलेल्या ट्विटवर रिप्लाय देत उत्तर दिलं आहे. तिच्या उत्तरानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात. तसंच अनेकांनी तिला पाठिंबा देखील दर्शवला आहे. उर्फीनं म्हटलंय, ‘तुमच्यासारख्या राजकारण्यांना पाहून फार वाईट वाटतं. लोकांच्या नजरेत येण्यासाठी तुम्ही माझ्यावर टीका करत आहात. बलात्काऱ्यांसाठी माझ्या कपड्यांना दोष देणं फार सोयीचं आहे. बेरोजगारी, लाखो बलात्कारी, खूनांची अनेक प्रकरण आणि समस्या आहेत त्याचं काय?’, असं म्हणत उर्फीनं चित्रा वाघांनाच प्रतिप्रश्न केला आहे. हेही वाचा - अरे..हे काय चाललंय मुंबईत; उर्फीच्या धिंगाण्यांवर संतापल्या चित्रा वाघ
उर्फीनं पुढे म्हटलंय, ‘तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बाजूला ठेवतात. ज्या महिलांना खरंच मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काहीच का करत नाही. महिलांचं शिक्षण, लाखो बलात्कारांच्या केसस याकडे तुम्ही का लक्ष देत नाहीत?’
चित्रा वाघांच्या टिकेला उर्फीनं दिलेल्या उत्तरानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अनेकांनी तिचं समर्थन देखील केलं आहे. उर्फीनं आतापर्यंत बिग बॉसमध्ये काम केलं आहे. त्याचप्रमाणे ये रिश्ता क्या कहलाता है, बेपनाह, जीजी मां, डायन सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. कोरोनाच्या काळात उर्फीला कामं मिळलं कमी झाल्यानं तिनं त्याच्या विचित्र फॅशन स्टाइलनं सर्वाचं लक्ष वेधलं. सोशल मीडियावर उर्फीला फॉलो करणारा आणि तिला ट्रोल करणारा वेगळा वर्ग आहे.