JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / आणि काय हवं! 10 वर्ष वाट पाहिली;अखेर उमेश-प्रियाने दिली गुड न्यूज, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

आणि काय हवं! 10 वर्ष वाट पाहिली;अखेर उमेश-प्रियाने दिली गुड न्यूज, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

उमेश आणि प्रिया या दोघांच्याही करिअरचा आलेख वेगाने वर जात असतानाच त्यांच्या चाहत्यांना या जोडीला एकत्र पाहण्याची खूप इच्छा होती. आता ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

जाहिरात

उमेश आणि प्रिया यांचं नवीन नाटक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जुलै : अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी इंडस्ट्रीतील क्यूट कपल म्हणून ओळखले जातात. दोघांची लव्ह स्टोरी हिट आहेच मात्र त्याच्या कामांमुळे त्यांना वेगवेळी प्रसिद्धी मिळाली आहे. ही रील आणि रिअल लाइफ जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. आणि काय हवं ही धम्माल वेब सीरिज काही वर्षांपूर्वी पाहायला मिळाली होती. ज्यात उमेश आणि प्रिया यांनी चांगलीच धम्माल उडवून दिली होती. आणि काय हवं नंतर उमेश आणि प्रिया जर तरची गोष्ट या मराठी नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आणि काय हवं नंतर जवळपास 10 वर्षांनी दोघे एकत्र काम करणार आहे. ‘जर तरची गोष्ट’ हे व्यावसायिक नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाटकाच्या माध्यमातून प्रिया आणि उमेशची हिट जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रिया बापट सादर करत असलेल्या ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी केले आहे. तर  इरावती कर्णिक यांनी लेखन केले आहे. तर नंदू कदम ‘जर तर ची गोष्ट’चे निर्माते आहेत. उमेश आणि प्रिया यांच्याबरोबर नाटकात आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हेही वाचा -  ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे विद्या बालनची कार्बन कॉपी, अक्षयचं नाही तर जावेद अख्तर यांनी देखील दिली होती ‘ही’ कॉम्प्लिमेंट रंगमंचावर एकत्र काम करण्याबाबत प्रिया बापट म्हणाली, ‘‘हे माझं दुसरं व्यावसायिक नाटक आहे. आपलंच प्रॉडक्शन असलेल्या नाटकात अभिनय करायला मिळणं आणि तेही आपल्या आवडत्या सहकलाकारासोबत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हा माझा हट्ट आणि इच्छा होती की माझं पुढील नाटकही उमेशसोबतच असावे. यासाठी आम्ही फार वाट पाहिली. अखेर ही इच्छा पूर्ण झाली आहे. अतिशय प्रेमाची आणि हक्काची माणसं या नाटकाशी जोडली गेली आहेत. आता लवकरात लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची उत्सुकता आहे.’’

संबंधित बातम्या

तर उमेश प्रियाबरोबर  पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल म्हणाला, ‘‘नाटक हे माझं पहिलं प्रेम आणि माझ्या खऱ्या आयुष्यातील माझं प्रेम असं एकत्र मी माझ्या नवीन नाटकात जगणार आहे. ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकानंतर आम्ही एकत्र एक चित्रपट केला, वेबसीरिज केली. परंतु त्यानंतर असं वाटत होतं की एकत्र नाटक कधी करणार? आणि आता हा योग जुळून आला आहे. त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. मुख्य म्हणजे सोनल प्रॅाडक्शन सोबत माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.’’

प्रिया आणि उमेश यांची हटके जोडी आता रंगमंचावर काय धुमाकूळ घालणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. चाहत्यांनी दोघांनाही पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या