मुंबई, 1 ऑक्टोबर- छोट्या पडद्यावर**(Tv Actress)** आपल्या अभिनयाची छाप पाडून बॉलिवूडमध्ये**(Bollywood)** एन्ट्री करणारी अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय (Mouni Roy) होय. मौनी सध्या सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांना घायाळ करत असते. ‘नागिन’ (Nagin) फेम मौनी रॉय लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मौनी दुबईचा उद्योगपती आणि आपला लॉन्गटाईम बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत**(Suraj Nambiar)** लग्न करणार आहे. तिच्या लग्नाचा खुलासा अभिनेत्रीच्या कझिनने स्वतः केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री मौनी रॉय २०२२ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मौनी आणि सूरज दुबई किंवा इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्याची शक्यता आहे. मौनी रॉय अनेक वर्षांपासून सूरज नांबियारसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सूरज हा दुबईमधील एक नामवंत उद्योगपती आहे. मौनी आणि सूरज अनेकवेळा एकत्र फिरताना दिसून आले आहेत. मौनी रॉयच्या लग्नाबाबत तिच्या कझिनने अनेक खुलासे केले आहेत. मौनी रॉयचा कझिन विद्युत रॉयसरकारने नुकताच Coche Behar च्या एका स्थानिक वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. यावेळी त्याने या गोष्टींचा खुलासा केला आहे. (**हे वाचा:** Mouni Roy Bikini Look: मौनी रॉयचा स्टनिंग ब्लू बिकिनी लुक, चाहते … ) होणार डेस्टिनेशन वेडिंग- अनेक कलाकारांचं डेस्टिनेशन वेडिंगचं स्वप्न असल्याचं आपण पाहिलं आहे. शिल्पा शेट्टी, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, रुबिना दिलॆक अशी अनेक कपल्स आहेत ज्यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलं आहे. नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज बंदीयार यांनीही डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन बनवला आहे. हे दोघेही येत्या २०२२ मध्ये दुबई किंवा इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करताना दिसून येतील, असं अभिनेत्रीचा कझिन विद्युतने म्हटलं आहे. तसेच त्याने आपण आपल्या कुटुंबासोबत उपस्थित असल्याचंही म्हटलं आहे. **(हे वाचा:** Oops moment! मौनी रॉयच्या फोटोशूट दरम्यान आली हवा, आणि नंतर… ) बँकर आणि उदयॊगपती आहे सूरज नांबियार- मौनी रॉयचा होणार पती सुरज नांबियार हा मूळचा बेंगलोरचा असून, त्याचा जन्म एका जैन कुटुंबात झाला आहे. सूरज आणि मौनी अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सूरज हा एक बँकर आणि दुबईतील उद्योगपती आहे. चाहत्यांना अनेक दिवसांपासून यांच्या लग्नाची उत्सुकता लागून आहे. लवकरच ही प्रतीक्षा संपणार असल्याचं दिसत आहे. (हे वाचा: Bigg Boss15: ‘उडान’ फेम ‘इमली’ची बिग बॉसमध्ये एन्ट्री; कोण आहे अभिनेत्री? ) मंदिरा बेदीच्या घरी झाली बोलणी- अभिनेत्री मौनी रॉय आणि मंदिरा बेदी एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मौनी रॉयच्या आईने मंदिरा बेदीच्या घरीच सूरजच्या आई-वडिलांची भेट घेतली असून. याठिकाणीच त्यांच्या लग्नाची बोलणी झाल्याचं म्हटलं जात आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, मौनी रॉय लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत बहुचर्चित ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे.