JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Tunisha Sharma : 'अम्मा तुम्ही माझ्यासाठी...' तुनिषाचा शिझानच्या आईसोबत तो फोनकॉल आला समोर

Tunisha Sharma : 'अम्मा तुम्ही माझ्यासाठी...' तुनिषाचा शिझानच्या आईसोबत तो फोनकॉल आला समोर

शिझानच्या कुटुंबीयांनी तुनिषाच्या घरच्यांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. अशातच आता तुनीषाचा शिझानच्या आईसोबत एक फोनकॉल समोर आला आहे.

जाहिरात

तुनिषा शर्मा-शिझान खान

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 जानेवारी: तुनिषा शर्माच्या मृत्यूप्रकरणी तिचा को-स्टार आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खान पोलीस कोठडीत आहे. पोलिसांकडून त्याची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी तुनिषाच्या आईने पत्रकार परिषद घेऊन शिझानवर अनेक गंभीर आरोप केले होते, आता शिझान खानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. यामध्ये त्याच्या कुटुंबीयांनी तुनिषाच्या घरच्यांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. तसेच आता तुनिषाचं आईसोबत काय नातं होते त्यावर देखील भाष्य केलं आहे. अशातच आता तुनीषाचा शिझानच्या आईसोबत एक फोनकॉल समोर आला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिझान खानच्या आईनं तुनिषाचे आईसोबत चांगले संबंध नव्हते असा खुलासा केला आहे. तसेच त्यांनी तिच्या सोबत झालेलं बोलणं सांगितलं आहे. त्याविषयी त्यांनी तुनिषासोबत बोलतानाचा एक फोनकॉल सगळ्यांना ऐकवला. यामध्ये तुनिषा त्यांना म्हणतीये कि, ‘तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहात अम्मा. खूप जास्त. तुम्हाला त्याची कल्पना सुद्धा नाही. त्यामुळेच तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करावीशी वाटते. मी तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करत जाईन, सांगत जाईन.’’  असं बोलताना तुनिषा रडत आहे. हेही वाचा - तुनिषा प्रकरणाला नवं वळण; बॉयफ्रेंड शिझानच्या कुटुंबियांनी दोघांच्या ब्रेकअपबाबत केला मोठा खुलासा पुढे ती म्हणतीये कि, ‘पण आता सध्या मला काय होतंय माहित नाही.’ तुनिषाचं शिझानच्या आईसोबत झालेलं हे बोलणं विरल बयानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट केलं आहे.  तुनिषाचा हा फोनकॉल सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

तुनिषाची आई फक्त पैशांसाठी मुलीला काम करायला लावत होती. तुनिषाला शिकायचं होतं, फिरायचं होतं, पण तिच्या आईने तिला काहीच करू दिलं नाही, असा आरोप शिझानची बहीण फलकने केलाय. तुनिषा नैराश्यात होती, पण तरीही तिची आई तिला काम करायला लावत होती. ती बऱ्याचदा आपल्याला काम करायची इच्छा नसल्याचं आम्हाला सांगत होती, पण तिची आई तिला जबरदस्ती काम करायला भाग पाडत होती, असंही फलक पत्रकार परिषदेत म्हणाली.

दरम्यान, तुनिषाचा मामा म्हणून माध्यमांसमोर येणारा पवन शर्मा हा तिचा मामा नसल्याचा दावा शिझानच्या कुटुंबाने केला आहे. तो तिचा मामा नव्हे तर तिचा मॅनेजर होता, असं त्यांनी सांगितलं. पवन शर्मा आवश्यकतेपेक्षा जास्त तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करत असल्याने तुनिषाने त्याला कामावरून काढलं होतं, असा दावाही त्यांनी केला आहे. तुनिषाला आम्ही गेल्या ५ महिन्यांत खूप आनंद दिला. ती आमच्याबरोबर फिरायला यायची, ती खूप खूश होती, पण ते तिच्या आईला पाहावत नव्हतं, असंही फलकने सांगितलं. तसेच शिझान आणि तिचं ब्रेकअप झालं नव्हतं, असा दावाही तिने केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या