JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Tunisha Sharma: तुनिषाच्या आत्महत्येनंतर सहकलाकाराची भावुक पोस्ट; केलं होतं बर्थ डे प्लॅनिंग

Tunisha Sharma: तुनिषाच्या आत्महत्येनंतर सहकलाकाराची भावुक पोस्ट; केलं होतं बर्थ डे प्लॅनिंग

येणाऱ्या 10 दिवसांवरच तुनीषाचा वाढदिवस होता. या कलाकारांसोबत तिने वाढदिवसाचं प्लॅनिंग सुद्धा केलं होतं.

जाहिरात

तुनिषा शर्मा- विनीत रैना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 डिसेंबर : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने सध्या सगळीकडे खळबळ माजली आहे. तिच्या आत्महत्येनंतर वेगवेगळी माहिती समोर येत आहे. तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात पोलीस एक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी टुनिषाचा सहकलाकार असलेला तिचा बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खानला ताब्यात घेतलं आहे.त्याचबरोबर आता तिचं सेटवरील सहकलाकारासोबत शेवटचं झालेलं बोलणं समोर आलं आहे. येणाऱ्या 10 दिवसांवरच तुनीषाचा वाढदिवस होता. या कलाकारांसोबत तिने वाढदिवसाचं प्लॅनिंग सुद्धा केलं होतं. येत्या 10 दिवसात तुनिषा 21 वर्षांची होणार होती पण त्यापूर्वीच तिने आपले जीवन संपवले. ‘अली बाबा’च्या सेटवर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या जाण्याने तिच्या कुटुंबियांसह मित्रपरिवारही धक्क्यात आहे. आता तिच्या जाण्यानंतर टीव्ही अभिनेता आणि तिचा सहकलाकार विनीर रैनाने तुनिषाच्या निधनावर भावुक पोस्ट केली आहे. त्यासोबतच त्याने त्याच्यासोबत झालेली बातचीत देखील शेअर केली आहे. हेही वाचा - Tunisha Sharma:12 वर्षीच मिळाला पहिला पे-चेक तर टेबलाखाली सापडलं पहिलं प्रेमपत्र; असं होतं तुनिषाचं आयुष्य तुनिषा शर्माच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. ‘अली बाबा’मध्ये त्याच्यासोबत काम केलेल्या विनीत रैनालाही धक्का बसला आहे. त्याने इंस्टाग्रामवर काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याच्या आणि तुनिषाच्या शेवटच्या संभाषणाचे काही भाग आहेत. इतकंच नाही तर त्याने एक फोटोही शेअर केला आहे, जो टीव्ही सीरियल ‘अली बाबा’ च्या सेटवरचा आहे. यासोबतच त्याने एक भावनिक नोटही लिहिली आहे.

कमी वयात या जगाचा निरोप घेणारी तुनिषा 4 जानेवारीला तिचा 21 वा वाढदिवस साजरा करणार होती. तिने आपल्या वाढदिवसाचं प्लॅनिंग देखील केलं होतं. याबाबत तिने अभिनेत्याशी चर्चाही केली. पहिल्या स्क्रीनशॉटमध्ये तुनिषाच्या चॅट आहेत. यामध्ये त्याने विनीत रैनाला भेटण्याची उत्सुकता व्यक्त केली होती. त्यावर लिहिले होते- लवकरच भेट, माझा वाढदिवसही येतोय, मग 4 तारखेला पार्टी करू. 15 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.10 वाजता पाठवलेल्या या मेसेजनंतर अभिनेत्री आपले जीवन संपवणार हे कोणास ठाऊक होते.

दुस-या पोस्टमध्ये तुनिषाचे एक सुंदर आणि निवांत चित्र आहे. सेटवर शूटिंगदरम्यान ती डोळे मिटून बसली होती. हा फोटो पोस्ट करत अभिनेत्याने लिहिले, ‘मी हा फोटो क्लिक केला आहे. मला माहित नव्हते की ते शेवटचे असेल. तू म्हणाली होतीस की मी मुंबईला आल्यावर मला भेटशील आणि आपण तुझा वाढदिवस साजरा करणार होतो आणि तू माझ्यासाठी गाणार होतीस. तू हे बरोबर केले नाहीस. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो. मी तुला नेहमी माझ्या हृदयात ठेवीन.’’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या