मुंबई, 9 मे- तुझ्यात जीव रंगलामधील सर्वांचं लाडकं कपल राणादा आणि पाठक बाई यांचा खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांत (akshaya deodhar hardeek joshi egngagement ) जीव रंगला आहे. या दोघांनी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर साखपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. चाहत्यांकडून या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव हा सुरूच आहे. एक सुखद धक्का कमी होता की काय आता या हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरनं गुपचूप लग्न केल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. त्याला कारणही तसचं आहे, अक्षयाचा एक मंगळसूत्र घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. यावरूनच चाहत्यांनी या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचा अंदाज बांधला आहे. सोशल मीडियावर अक्षया देवधरचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत अक्षया साडीत दिसते आहे आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून त्या दोघांनी गुपचूप लग्न केले की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अक्षयाचा हा व्हिडिओ जुना असल्याचे दिसत आहे. तिच्या एका फॅनपेजनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र तिच्या याच व्हिड़िओवरून या दोघांनी लग्न केल्याचा अंदाज बांधला आहे. वाचा- शिवानी-विराजसचं दणक्यात पार पडलं रिसेप्शन, या कलाकारांनी लावली हजेरी! अक्षया आणि हार्दिकनं साखरपुडा केल्याची बातमी चाहत्यांच्यासोबत शेअर करताच या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे. आता चाहत्यांना या दोघांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. छोट्या पडद्यावरली लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी अक्षया आणि हार्दिकची आहे. आता ही जोडी खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांचा साथ देण्यासाठी सज्ज झाली आहे.
झी मराठी वरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजली बाई आणि राणादा या ऑनस्क्रीन जोडीला खूप लोकप्रियता मिळाली. बऱ्याच दिवसांपासून अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सुरू होती. मात्र याबद्दल त्या दोघांनी कधी सांगितले नव्हते. मात्र आता या दोघांनी साखरपुडा करत दोघांच्या नातं जगजाहीर तर केलं आहेच शिवाय नात्याला नाव देखील दिलं आहे. चाहत्यांना देखील या जोडीला एकत्र पाहून आनंद झाला आहे.