JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Tu chal pudha : 'नवरा बायकोच्या नात्यात फक्त प्रेम नाही आदर हवा'; अश्विनीच्या उत्तराने जिंकलं महिला प्रेक्षकांचं मन

Tu chal pudha : 'नवरा बायकोच्या नात्यात फक्त प्रेम नाही आदर हवा'; अश्विनीच्या उत्तराने जिंकलं महिला प्रेक्षकांचं मन

आजपर्यंत सतत नवऱ्याच्या बाजूने उभी राहणारी, त्याला खंबीर पाठबळ देणारी अश्विनी आता त्याच्या विरुद्ध जाणार आहे. श्रेयसला साथ देणारी अश्विनी आता त्याला चांगलेच बोल सुनावणार आहे.

जाहिरात

Tu chal pudha

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,  17 सप्टेंबर :  सर्वसामान्य गृहिणीची कथा असलेल्या ‘तू चाल पुढं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात बाजी मारली आहे. या मालिकेतील अश्विनीला महिला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आहे.  आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणारी, कुटुंब साभांळणारी आणि वेळी नवऱ्याला आपल्या बाजूनं कसं मनवायचं हे उत्तमरित्या माहिती असणारी अश्विनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेच्या सोशल मीडियावरील व्हिडिओंना येणाऱ्या कमेंटमधून मालिकेचा प्रेक्षकवर्ग वाढत असल्याचंही दिसत आहे. आजपर्यंत सतत नवऱ्याच्या  बाजूने उभी राहणारी, त्याला खंबीर पाठबळ देणारी अश्विनी आता त्याच्या विरुद्ध जाणार आहे.  श्रेयसला साथ देणारी अश्विनी आता त्याला चांगलेच बोल सुनावणार आहे. पण यामुळे तिने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. नुकताच मालिकेचा एक प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये अश्विनी आणि श्रेयसचे रोमँटिक क्षण दाखवले आहेत. श्रेयस अश्विनीच्या केसांमध्ये गजरा माळत तिला ‘छान  दिसताय  मिसेस वाघमारे’ असं म्हणतो. तेव्हा अश्विनीदेखील आनंदात असते.  पण दुसऱ्याच क्षणी काहीतरी खाली पडून फुटत तेव्हा लगेच राहत श्रेयस तिला ‘बघतेस काय नुसतं उचल ते’ असं म्हणतो. तेव्हा मात्र अश्विनी त्याच्यावर चिडते. केसात माळलेला  गजरा काढून श्रेयसला परत देत ती म्हणते, ‘‘मिस आणि मिसेस मध्ये फरक फक्त ‘आर’ चा आहे. तो आर म्हणजे रिस्पेक्ट. नवरा बायकोच्या नात्यात फक्त प्रेम नाही आदर हवा.’’

संबंधित बातम्या

अश्विनीचा हा दृष्टिकोन  श्रेयसला कधी समजेल  माहित नाही पण प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. अल्पावधीतच हा प्रोमो हिट झाला आहे. अनेक प्रेक्षकांनी विशेषतः महिला प्रेक्षकांनी या पोस्टवर कमेंट करत अश्विनीला पाठींबा दर्शवला आहे. ‘लेखकाला सलाम’, ‘अश्विनी जे बोलली ते खरं  आहे’ अशा कमेंट प्रेक्षकांनी  केल्या आहेत. हेही वाचा - Ata Houde Dhingana : सिद्धार्थनं असं काय विचारलं? ज्यामुळे ‘होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर सुवा आई ढसाढसा रडली आतापर्यंत नवऱ्याच्या कुठल्याही गोष्टीला पाठींबा देणारी अश्विनीने श्रेयसला त्याची चूक दाखवून दिली आहे. हा भाग मालिकेत आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. याआधी झी मराठीची मालिका ‘अग्गबाई सासूबाई’ मधील शुभ्राने म्हटलेला  ‘आई कुठे काय करते’ हा डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्याप्रमाणेच अश्विनीचा हा डायलॉग सध्या महिलांमध्ये लोकप्रिय होत आहे.

अश्विनी आणि श्रेयस यांना कुटुंबासाठी नवं घर घ्यायचं आहे. राहणीमान उंचवायचं आहे. श्रेयस अनेकांना घरासाठी कर्ज मिळवून देणाऱ्या कंपनीत नोकरी करायचा पण तेच काम स्वतंत्रपणे करण्याचं ठरवून त्याने बिझनेस सुरू केला आहे. अश्विनीनेच त्याच्या ऑफिससाठी एक जागाही शोधून काढली. अश्विनीचा सपोर्ट पाहून मध्यंतरी श्रेयस तिच्यावर खुश झाला होता. त्यामुळॆ आगामी भागांमध्ये मालिकेत चांगला ट्रॅक  पाहायला मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या