मुंबई, 27 ऑगस्ट: झी मराठीवर नव्यानं सुरू झालेली अभिनेत्री दीपा परबची प्रमुख भूमिका असलेली ‘तू चाल पुढं’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतील उतरताना दिसत आहे. अनेक दिवसांनी तू चाल पुढंच्या निमित्तानं नव्या विषयाची मालिका झी मराठीवर पाहायला मिळत आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणारी, कुटुंब साभांळणारी आणि वेळी नवऱ्याला आपल्या बाजूनं कसं मनवायचं हे उत्तमरित्या माहिती असणारी अश्विनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेच्या येत्या भागात काय घडणार आहे जाणून घ्या. तू चाल पुढं मालिकेत आतापर्यंत आपण पाहिलं की, अश्विनी तिची घर सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करत आहे. सगळ्यांची मन जपून नवऱ्याला साथ देत आहे. आपल्या नवऱ्यानं बिझनेस करावा असं अश्विनीला वाटत असतं. त्यामुळे ती नकळत श्रेयसला बिझनेस करणं किती फायद्याचं असतं हे पटवून देत असते. तर दुसरीकडे श्रेयसचं कंपनीत भांडण होतं आणि तो नोकरी सोडून घरी येतो. श्रेयस नोकरी सोडून बिझनेस करणार असल्याचं अश्विनीला कळल्यानं ती खुश होते पण घरातील सगळे श्रेयसवर नाराज होते. पण अश्विनी मात्र जिद्दीनं घरच्यांना श्रेयसनं बिझनेस केल्यानं आपल्याला किती फायदा होईल हे पटवून देते. हेही वाचा - Mazhi Tuzhi Reshimgaath : नेहा-अविनाशचं सत्य सगळ्यांसमोर उघड; यश-नेहाच्या नात्यात येणार का कायमचा दुरावा?
श्रेयस आणि अश्विनी दोघेही बिझनेससाठी जागा शोधत आहेत. अनेकांना विचारून श्रेयसला अश्विनीच्या मदतीनं एक जागा मिळते. दोघेही नवी जागा ताब्यात घेतात. मालिकेचा प्रोमो रिलिज झाला असून श्रेयस आणि अश्विनी ऑफिसच्या नव्या जागी जातात. शटर ओपन करताच रूममध्ये प्रचंड धुळ, अडगळ झालेली दिसते. श्रेयस मात्र ‘या भंगार जागेत आपलं ऑफिस सेटअप करायंच?’, असं म्हणत नाराजी व्यक्त करतो. अश्विनी मात्र त्याला ‘थोडी डागडुजी, रंगरंगोटी झाली की मस्त दिसले’, असं म्हणत समजूत काढते. त्यावर श्रेयस तिला ‘माझ्याकडे यासाठी मदत मागायची नाही’, असं म्हणतो. पण ‘हो जायेगा रे सब’, असं म्हणत विश्वास दाखवते. मालिकेत आता अश्विनी एकट्यानं ऑफिसचं सगळं काम, डागडुजी कशी करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्रेयसचा बिझनेस उभारण्यासाठी अश्विनीला कोण साथ देणार का? तसंच एकीकडे शिल्पीनं देखील घराची जबाबादारी नाकारुन मुद्दाम नोकरी देखील सोडली आहे. त्यामुळे श्रेयस आणि अश्विनीच्या डोक्याचा ताप आणखी वाढला आहे. त्यामुळे आता अश्विनीनं श्रेयसचा डोक्यात सोडलेला बिझनेसचा किडा ती कशी पुढे घेऊन जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.