JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'Tom And Jerry' आणि 'Popeye'चे दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'Tom And Jerry' आणि 'Popeye'चे दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बालपणी अनेकांना ज्या कार्टून कॅरेक्टरने सर्वांना निखळ आनंद दिला, शब्द न वापरता केवळ कृतीतून ज्याने आपल्याला हसायला शिवकले त्या टॉम अँड जेरीचे दिग्दर्शक आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 एप्रिल : बालपणी अनेकांना ज्या कार्टून कॅरेक्टरने सर्वांना निखळ आनंद दिला, शब्द न वापरता केवळ कृतीतून ज्याने आपल्याला हसायला शिवकले त्या टॉम अँड जेरीचे दिग्दर्शक आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रकार (illustrator) आणि Tom And Jerry दिग्दर्शक जीन डेच (Gene Deitch) यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले आहे. चेक प्रजासत्ताकमधील प्राग शहरामध्ये असणाऱ्या त्यांच्या राहत्या घरी त्यांचं १६ एप्रिल रोजी निधन झालं. मृत्यूचे कारण अद्याप माध्यमांना सांगण्यात आलेले नाही. चेक प्रजासत्ताकमधील जीन यांचे प्रकाशक पीटर हिमेल (Petr Himmel) य़ांनीच जीन यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली. जीन यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि पहिल्या पत्नीची तीन मुले असा परिवार आहे.

जीन यांनी तसं वेगवेगळ्या क्षेत्रांंमध्ये काम केलं आहे. मात्र त्यांचा ओढा कमर्शिअल आर्टकडेच होता. एव्हीएशन कंपनीमध्ये ड्राफ्टमन, लष्करासाठी काम, वैमानिकाचं प्रशिक्षण इत्यादी क्षेत्रात काम केल्यानंतर आरोग्याच्या अजचणींंमुळे त्यांना ही क्षेत्रं सोडावी लागली. कमर्शिअल आर्टकडे वळल्यानंतर त्यांनी अ‍ॅनिमेशनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी ‘Tom And Jerry’चे १३ एपिसोड्स तसंच पोपॉय (Popeye) या प्रसिद्ध कॉर्टून सिरीजची निर्मिती देखील त्यांनी केली होती. (हे वाचा- #AskSRK लोकसंख्या वाढविण्यापेक्षा मुलांसोबत खेळतो, चाहत्याच्या प्रश्नांवर शाहरुख ) जीन यांंना त्यांच्या चित्रपटांसाठी अनेकदा वेगवेगळ्या पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. 1958 साली सिडनीज फॅमेली ट्री या चित्रपटासाठी अकॅडमी पुरस्कारांचे ऑस्कर्स नामांकन, त्यानंतर १९६० साली मुनरो या अ‍ॅनिमेशन चित्रपटासाठी सर्वोत्तम अ‍ॅनिमेशनपट म्हणून नामांकन, तर  १९६४ या वर्षी हियर्स नूडनीक आणि हाऊ टू अव्हॉइड फ्रेंडशीप या दोन चित्रपटांसाठी यांना सर्वोत्तम अ‍ॅनिमेशनपट कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं. संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या