JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेत्रीवर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला, मोबाईल पळवला, डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत

अभिनेत्रीवर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला, मोबाईल पळवला, डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत

ही अभिनेत्री पार्कमध्ये फिरायला गेली होती. त्या वेळी हल्ला झाला. हल्लेखोराने तिच्याकडच्या किमती वस्तू लुटायचा प्रयत्न केला. अभिनेत्रीने प्रतिकार केल्यावर तेव्हा त्याने अचानक तिच्या चेहऱ्यावर ठोसा मारला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 नोव्हेंबर : टॉलिवूड अभिनेत्री शालू चौरसियासोबत (Shalu chourasiya) एक गंभीर घटना घडली आहे. हैदराबादच्या टॉनी बंजारा हिल्स येथील केबीआर पार्कजवळ शालूवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आणि यादरम्यान ती गंभीर जखमी झाली आहे. ती फक्त गंभीर जखमी झालेली नाही तर तिचा मोबाईलही (Mobile) हिसकावण्यात आला. रविवारी (14 नोव्हेंबर) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास शालू पार्कमध्ये फिरत होती यावेळी एका अज्ञात व्यक्तीने अचानक तिच्यावर हल्ला केला आणि तिचा फोन हिसकावला. या हल्ल्यात ती जखमी झाली आहे. या सर्व घडलेल्या प्रकारानंतर O Pilla Nee Valla फेम शालूने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिनं पोलिसांना सांगितले की, या अज्ञात व्यक्तीने पहिल्यांदा तिला तिच्याजवळील किंमती वस्तू देण्यास सांगितलं. जेव्हा तिनं याला नकार दिला तेव्हा त्याने अचानक तिच्या चेहऱ्यावर ठोसा मारला. यासोबत दगड फेकण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी ती काहीशी घाबरली तोपर्यंत हल्लेखोराने तिचा मोबाईल हिसकावून पळ काढला. या घटनेत अभिनेत्रीच्या डोक्याला आणि डोळ्याला  गंभीर दुखापत झाली असून तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचा :  श्रेया बुगडेनं दिलेल्या गिफ्टमुळं कुशल बद्रिके आयुष्य पलटलं; असा आहे किस्सा अभिनेत्रीच्या तक्रारीवरून बंजारा हिल्स पोलिसांनी (Banjara hills hyderabad police) गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हल्लेखोराची ओळख पटवण्यासाठी ते परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करत आहेत. पोलिसांचे पथक फोनच्या आयएमईआय किंवा टॉवर लोकेशनच्या माध्यमातून हल्लेखोराचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. शहरातील या मोठ्या केबीआर पार्कमध्ये प्रसिद्ध व्यक्ती, व्यापारी आणि राजकीय नेते मंडळी सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला येत असतात. यापूर्वी या पार्कच्या परिसरात अशा घटना घडल्या आहेत. वाचा :  ‘या’ मराठी सेलिब्रिटी कपलच्या घरी चिमुकल्या पाहुण्याच आगमन एका व्यक्तीने 2014 मध्ये, अरबिंदो फार्माचे कार्यकारी के नित्यानंद रेड्डी यांच्यावर एके-47 ने गोळ्या झाडल्या होत्या. मॉर्निंग वॉक आटोपून ते कारमध्ये बसले होते. याचवेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला होता. सुदैवाने या अपघातात रेड्डी यांचा जीव थोडक्यात बचावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या