मिमी चक्रवर्ती
मुंबई, 23 फेब्रुवारी- तृणमूल काँग्रेसची खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती सोबत नुकतंच एक चकित करणारा प्रकार घडला. अभिनेत्रीला विमानप्रवासात एक किळसवाणा अनुभव आला ज्यामुळे सध्या ती प्रचंड चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने आपल्यासोबत घडलेला प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. तसेच मिमीने एयरलाईन कंपनीला मेल लिहत तक्रारही केली आहे. पाहूया अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं. हॉटेल्स,रेस्टोरंट किंवा इतर कोणत्याही ठिकाणी आचारी स्वयंपाक बनवताना हेयर कॅप लावतात किंवा डोक्यावर एखाद कापड तरी बांधतात. त्यामुळे जेवण बनवताना जेवणात केस जाण्याचा धोका कमी होतो. परंतु विमानप्रवासात अभिनेत्रीला आलेल्या प्रकाराने ती चांगलीच नाराज झाली आहे. अभिनेत्रीने ट्विट करत आपल्याला आलेला अनुभव सांगितला आहे. (हे वाचा: Shehnaaz Gill: शेहनाज गिलने मुंबईत खरेदी केलं घर; अधिक पैसे मिळवण्यासाठी करते ‘हे’ काम ) अभिनेत्रीने विमानात प्रवास करत असताना भूक लागल्याने जेवणाची ऑर्डर दिली होती. जेवण आलं पण जेवताना अचानक तिच्या तोंडात असलेल्या घासात काहीतरी आल्याचं तिला जाणवलं. तिने पाहिलं तर जेवणात केस आढळला. त्यामुळे अभिनेत्रीने आणि खासदार मिमी प्रचंड संतप्त झाली आहे.
मिमी चक्रवर्तीने तोंडात आलेला केस काढून प्लेटवर ठेवला आणि त्याचे फोटो काढून ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच अभिनेत्रीने एयरलाईन कंपनीलाही मेल करत तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्रींच्या या मेलला उत्तर देत कंपनीने घडलेल्या प्रकारची दखल घेत योग्य ती पुढील कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. परंत सध्या हे प्रकरण चांगलंच व्हायरल होत आहे.
खासदार-अभिनेत्रीचं ट्विट- मिमीने ट्विट करत लिहलंय, ‘डिअर अमिरात.. ‘मला वाटतं तुम्ही आता खूप मोठे झाला आहात. त्यामुळेच तुम्हाला तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची काळजी नाही. एखाद्याच्या जेवणात केस आढळणं हि अत्यंत किळसवाणी गोष्ट आहे. आणि माझ्या घासातच केस आढळला. मी केलेल्या मेलबाबत दिलगिरी व्यक्त करणं तर दूरच पण तुम्ही साधं उत्तर देणंही महत्वाचं समजत नाही. तुम्हाला खरंच या गोष्टींची काळजी असेल, तर माझ्या मेलला उत्तर द्याल’. या सर्व प्रकरणानंतर दुबई एयरलाईनची महागड्या एयरलाईन्सने मेलला उत्तर दिलं आहे.