JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बिग स्टार्सचे हे 7 चित्रपट थिएटरमध्ये नव्हे तर मोबाइलवर पाहता येणार; OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज

बिग स्टार्सचे हे 7 चित्रपट थिएटरमध्ये नव्हे तर मोबाइलवर पाहता येणार; OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज

भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदात अशा प्रकारे मोठ्या स्टार्सचे 7 चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 जून : राज्यातील कोरोनाची वाढती संख्या पाहता 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. देशभरातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात अद्याप चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरू करण्यात आलेले नाही. परिणामी चित्रपट निर्माते OTT प्लॅटफॉर्मकडे वळले आहे. येत्या काळात तब्बल 7 चित्रपट Disney+Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. जुलै ते ऑक्टोबर या दरम्यान हे 7 चित्रपट रिलिज होणार आहेत. यामध्ये अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’, आलिया भट्टचा ‘सडक -2’, अजय देवगणचा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’, अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’, सुशांत सिंहचा ‘दिल बेचारा’, ‘लूटकेस’ आणि ‘खुदा हाफिज’ हे चित्रपट सामील आहेत. भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे मोठ्या कलाकारांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत.

येथे सर्वात पहिला चित्रपट सुशांत सिंह राजपूत याला श्रद्धांजली देत त्याचा दिल बेचारा हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल. दिल बेचारा या चित्रपटाचा पोस्टर यापूर्वीच रिलिज करण्यात आला असून या चित्रपटाचा दिग्दर्शक मुकेश छाबडा आहेत. बॉलिवूडकी होम डिलिव्हरी याअंतर्गत Disney+Hotstar  वर हे चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. संपादन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या