JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / संगीत क्षेत्रातूनही लवकरच आत्महत्येचं वृत्त येऊ शकतं समोर; गायक सोनू निगमचा धक्कादायक खुलासा

संगीत क्षेत्रातूनही लवकरच आत्महत्येचं वृत्त येऊ शकतं समोर; गायक सोनू निगमचा धक्कादायक खुलासा

या V-LOG मध्ये सोनू निगम यांनी संगीत क्षेत्रातील मोठे खुलासे केले आहे. याशिवाय त्यांना मिळालेल्या वागणुकीबद्दल सांगितलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जून : साधेपणा आणि दर्जेदार अभिनयाने जनतेचं मन जिंकलेल्या सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या सर्वांसाठीच धक्कादायक आहे. सुशांतच्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातील काळी बाजू समोर आली आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही, लॉबी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यातच गायक सोनू निगम यांनी एक V-LOG आपल्या यू-ट्यूब चॅनलवरुन प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्याने संगीत क्षेत्रातील व्यावसायिकांच्या लॉबीविषयी भीती व्यक्त केली आहे. तरुण गायकांना या लॉबीचा मोठा फटका सहन करावा लागत असल्याचेही ते यामध्ये म्हणाले आहेत. गेल्या 10 ते 15 वर्षांत सोनू निगम यांना संगीत क्षेत्रात फारचं काम मिळत नाही. मात्र मला याचं दु:ख नसल्याचं सोनू निगम म्हणतात. मात्र या क्षेत्रात येणाऱ्या नव्या कलाकारांनाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. जर संगीत क्षेत्रात नव्या कलाकारांसोबत अशी वागणूक दिली गेली, तर भविष्यात मोठा फटका सहन करावा लागत आहे. अनेकदा या क्षेत्रात पॉवरचा चुकीचा उपयोग केला जातो. मलाही अनेकदा चुकीची वागणूक दिली गेली आहे.

माझ्यासोबत अशी वागणूक दिली जात असेल तर तरुण कलाकारांना कोणकोणत्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं, हे तुम्हाला कळू शकतं. दरम्यान शेखर कपूर यांनी सुशांतच्या निधनानंतर त्याच्या आठवणीत ट्वीट केलं होतं. त्यांनी लिहिलं, मला माहित आहे, तू कोणत्या दुःखातून जात होतास. मला माहित आहे कोणी तुला अपमानीत केलं होतं. तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडला होतास. किती बरं झालं असतं जर मागचे सहा महिने मी तुझ्या सोबत असतो किंवा तू माझ्यापर्यंत पोहोचू शकला असतास. जे झालं ते त्या लोकांचं कर्म होतं, तुझं नाही.

 हे वाचा- VIDEO :चाहत्यांच्या मनात तू कायम जिवंत राहशील; सुशांतच्या अस्थींचं गंगेत विसर्जन

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या