सुधीर वर्मा
मुंबई, 24 जानेवारी: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. टॉलिवूड अभिनेता सुधीर वर्माने आत्महत्या केली आहे. त्यांनी सोमवारी (२३ जानेवारी) विशाखापट्टणम येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. सुधीर वर्मा यांचे सहकलाकार असलेले अभिनेते सुधाकर यांनी त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून सुधीर वर्मा यांच्या आत्महत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. सुधीर वर्माच्या कुंडानापू बोम्मा चित्रपटात त्यांनी सोबत काम केले होते. सुधीर वर्मा यांनी आत्महत्येचे पाऊल कोणत्या कारणासाठी उचलले हे समजू शकलेले नाही. मात्र काही काळापासून ते वैयक्तिक आयुष्यात अडचणीतून जात असल्याचे बोलले जात आहे. तो मानसिकदृष्ट्याही खूप दडपणाखाली होता. त्यामुळेच सुधीर वर्मा यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. हेही वाचा - Nawazuddin Siddiqui : सासूनं केली आलियाची पोलिसांत तक्रार; नवाजुद्दीनच्या घरचा वाद चवाट्यावर एका मीडिया रिपोर्टनुसार सुधीरने 10 जानेवारीला काहीतरी विषारी पदार्थ खाल्ला होता. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. तिथेच त्याने स्वतःहून विष झाल्याचे सांगितले. अनेक काळापासून त्याच्यावर इलाज सुरु होता. पण काल त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मागे पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.
सुधीर वर्मा यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण साउथ फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला असून सोशल मीडियावर सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. सुधीर वर्माने 2013 मध्ये ‘स्वामी रा रा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पण सुधीर वर्मा यांना 2016 मध्ये आलेल्या कुंदनपू बोम्मा या चित्रपटातून बरीच ओळख मिळाली. ओळख मिळूनही सुधीर वर्मा यांना चित्रपटांच्या जोरदार ऑफर्स मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सुधीर वर्मा यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. 2022 हे वर्ष साऊथ फिल्म इंडस्ट्रीसाठी खूप वाईट वाटलं. अनेक सेलिब्रिटींनी या जगाचा निरोप घेतला. विद्रोही स्टार कृष्णम राजू ते एम बलाया, दिग्दर्शक सरथ आणि तेलुगू स्टार कृष्णा यांच्या नावांचा समावेश आहे.