मुंबई, 22 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Tapasee Pannu), स्वरा भास्कर (Swara Bhaskar) आणि कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्यामध्ये सध्या सोशल मीडियावर ‘कॅट फाइट’ सुरु असल्याचे दिसते आहे. या सोशल मीडिया वॉरची सुरुवाते तेव्हा झाली जेव्हा एका मुलाखतीमध्ये कंगनाने नेपोटिझम आणि स्टार किड्सच्या मुद्द्याबरोबरच अनेक बॉलिवूड कलाकारांवर आउडसाइडर असूनही ते गप्प राहतात असा आरोप केला होता. अनेक आरोप आणि कंगनाने ‘चापलूस’ असं म्हटल्यानंतर तापसी पन्नूने एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कंगना स्वत: स्टार किड्सचे समर्थन करत आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रीय राहणाऱ्या तापसीने कंगनाचा एक जुना व्हिडीओ शेअर करत तिच्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडीओमध्ये कंगनाने ‘स्टार किड्स’ बाबत काही समस्या नसल्याचे म्हटले आहे. तापसीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान कंगनाचा हा व्हिडीओ अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील शेअर केला आहे.
तापसीने आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये कंगनाने फिल्ममेकर महेश भट्ट यांचे कौतुक केले आहे. त्यावर तापसीने असे लिहिले आहे की, ‘अरे आता फायनल काय आहे? हे मॅटर करतं की तुम्ही इनसायडर आहात की आउटसायडर, हे खूप गोंधळात टाकणारं आहे. मी माझा स्टँड काय आहे ही विसरण्याआधी साइन आउट करते’.
कंगनाने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये असे आरोप लावले होते की, इंडस्ट्रीमध्ये एक ‘मुव्ही माफिया’ आहे जो बाहेरून येणाऱ्या लोकांचे करिअर संपुष्टात आणतो, जो त्याची चापलुसी करत नाही. तिने तापसी पन्नू आणि स्वरा भास्करचे नावही या मुलाखतीत घेतले होते. दरम्यान फक्त तापसी नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींनी कंगनाला लक्ष्य केले आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपने देखील तिच्यावर निशाणा साधला होता.