JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / तनुश्री दत्ताच्या निशाण्यावर आता बॉलिवूडमधला 'हा' मोठा हिरो, म्हणाली...

तनुश्री दत्ताच्या निशाण्यावर आता बॉलिवूडमधला 'हा' मोठा हिरो, म्हणाली...

मागच्या वर्षी Me Too आंदोलनानं सगळीकडे खळबळ माजवणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तनुश्रीनं अभिनेता आमिर खानवर निशाणा साधला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 सप्टेंबर : मागच्या वर्षी Me Too आंदोलनानं सगळीकडे खळबळ माजवणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तनुश्रीनं अभिनेता आमिर खानवर निशाणा साधला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तनुश्रीनं आमिरला उद्देशून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रकरण आमिरचा आगामी सिनेमा मोगुलशी संबंधित आहे. गुलशन कुमारच्या या बायोपिकमध्ये आमिरनं वापसी केली. पुन्हा एकदा हा सिनेमा स्वीकारण्याबाबत आमिर एका मुलाखतीत बोलला. याच मुलाखतीतील काही मुद्द्यांवर तनुश्री नाराज झाली आहे. ‘मोगुल’ सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर मीटू अभियानामध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आमिरनं हा सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही दिवासांपूर्वीच आमिरनं या सिनेमासाठी होकार कळवला. याबाबत बोलताना तो म्हणाला, ‘सुभाष कपूर यांच्यावर लावण्यात आलेले आरोप पूर्णतः चुकीचे आहेत.’ मलायका अरोरानं शेअर केला Throwback बिकिनी फोटो, युजर्स म्हणाले… आमिर पुढे म्हणाला, ‘सुभाष यांच्यावर लावलेल्या आरोपांबद्दल समजल्यावर माझी झोपच उडाली होती. मी त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक महिलांशी संपर्क साधला आणि विशेष म्हणजे त्याच्याबद्दल या कोणत्याच महिलेची काहीही तक्रार नव्हती उलट या सर्वांनी सुभाष यांचं कौतुकच केलं. आमिर सांगतो, मी IFTDAला पत्र लिहून मी सुभाष यांच्यासोबत काम करण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली होती.’ स्वागत नहीं करोगे हमारा! सलमानचा Dabangg 3 ‘या’ दिवशी होणार रिलीज पिंकव्हिलानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तनुश्री दत्तानं आमिरच्या या प्रतिक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे. तनुश्री म्हणाली, ‘मी आमिरची मुलाखत वाचली. मी त्याला विचारु इच्छिते की, बॉलिवूडमध्ये कोणाला रात्र कशी जोप येऊ शकते जेव्हा एका मुलीचं लैंगिक शोषण झालेलं असतं आणि तिला इंडस्ट्रीमधून बाहेर काढलेलं असतं. माझी कोणीही मदत केली नाही त्यामुळे तो अपमान आणि ते अत्याचार मी एकट्यानं झेलले आहेत.’ तनुश्री पुढे सांगते,’ बॉलिवूडमध्ये सध्या मीटूच्या आरोपींवर अनेक लोकांना दया येत आहे. मात्र एका पीडितेसाठी कोणाच्याच मनात दयाभाव नाही. सिनेमाच्या सेटवर माझी हरासमेंट झाल्यानंतर माझ्यासाठी कोणीही पत्र लिहिलं नव्हतं. माझी कोणालाच दया येत नाही का आमिर ?’ आमिर खाननं तनुश्रीच्या या प्रश्नांची अद्याप कोणतीही उत्तरं दिली नाहीत. विराटची ‘वॉटर बेबी’, अनुष्का शर्मानं शेअर केले HOT PHOTO ============================================ VIDEO: आता शत्रूची काय बिशाद! भारतीय लष्कराचा ताफा आणखी मजबूत होणार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या