नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : उत्तम अभिनेता, गायक असलेल्या आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) हटके भूमिकांमुळे हा बॉलिवूडमध्ये एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून ठसा उमटवला आहे. आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) हीदेखील एक उत्तम लेखिका (Writer) असून, ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. हे दोघेही सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. अलीकडेच ताहिराला दुधी भोपळ्याच्या रसमुळे इन्फेक्शन झाल्याने ती हॉस्पिटलमध्ये दाखल होती. आपला हा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. ताहिराने ब्रेस्ट कॅन्सरशीही यशस्वीपणे लढा दिला असून, आपल्या स्वतंत्र आणि स्पष्ट विचारांसाठी ती प्रसिद्ध आहे. नुकतंच तिने एक पुस्तकही (Book) लिहिलं असून, त्यात वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. अलीकडेच तिने मातृत्वाविषयी दिलेल्या एका मुलाखतीत आपण आपल्या मुलालाच एकदा रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) कसं विसरलो होतो, त्याचा किस्सा सांगितला. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ताहिराने हा किस्सा सांगितला. तिचा मुलगा विराजवीर पाच महिन्यांचा असताना ती त्याला घेऊन तिच्या मित्रांसोबत जेवणासाठी गेली होती. विराजवीरला तिनं प्रॅममध्ये झोपवलं होतं. जेवण झाल्यानंतर तिने मित्रांना निरोप दिला आणि ती लिफ्टकडे चालू लागली. त्याच वेळी एक वेटर धावत आला आणि तो म्हणाला, की ‘मॅडम, तुम्ही तुमच्या मुलाला (Your Baby) विसरला आहात.’ त्या वेळी तिला खूप लाज वाटली. लिफ्टमधल्या अन्य व्यक्ती तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहत होत्या. ‘‘काय आई आहे, स्वतःच्या मुलाला विसरली,’ असे भाव त्यांच्या नजरेत स्पष्ट वाचता येत होते. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना लोक बिल द्यायला विसरतात. आपली पर्स, बॅग विसरतात, पण मी रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना बॅग आणि बिल घ्यायला विसरले नव्हते, तर माझ्या मुलालाच विसरले होते. अतिशय विचित्र अनुभव होता तो. मी कधीच लिफ्टमधल्या लोकांच्या त्या नजरा विसरू शकणार नाही,’ असं तिने सांगितलं.
विसराळूपणाने अशा अनेक विचित्र गोष्टी केल्याचं ताहिराने या वेळी सांगितलं. सुट्टीच्या दिवशी (Holliday) मुलांना शाळेत पाठवण्यासारखे पराक्रमदेखील तिने केले आहेत. अनेकदा ती सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन शाळेत (School) पोहोचली आहे. अशा गोष्टी आजही तिच्याकडून घडतात, पण आता ती स्वतःला माफ करते, असं तिनं सांगितलं.
ताहिरा आजारी होती त्या काळात तिची आई तिच्या मुलांची काळजी घेत होती. तिची आई मुलांना शाळेचा टिफिन बनवून द्यायची, त्या वेळी आठवड्यातून दोनदा चीज सँडविच देण्याबद्दल ताहिराला काळजी वाटायची. ते पौष्टिक पदार्थ नसल्याच्या विचाराने ती अस्वस्थ व्हायची, पण आता ती बदलली असल्याचं तिने म्हटलं आहे. आता आपल्याला अशा गोष्टींनी फरक पडत नाही. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला आपण शिकलो आहोत, असं ताहिरानं सांगितलं.