Dayaben from TMKOC
मुंबई, 16 सप्टेंबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.गेल्या १४ वर्षांपासून ही मालिका अव्याहतपणं सुरू आहे पण आजही प्रेक्षकांना तितकीच आवडते. मध्यंतरी या मालिकेतील अनेक कलाकारांनी एक्झिट घेतली. त्यामुळे निर्मात्यांचं चांगलचं धाबं दणाणलं होतं. मालिकेतील दयाबेन अर्थात दिशा वकानी पाच वर्षांपूर्वी प्रेग्नंसीच्या कारणामुळे मालिकेतून बाहेर पडली. त्यानंतर आजतागायत ती कार्यक्रमात परतेली नाही. आजही कार्यक्रमाचे चाहते आणि खुद्द निर्माते असीत कुमार मोदी यांना दिशा परतण्याची अपेक्षा आहे. पण प्रेक्षक आजही तिची वाट पाहत आहेत. आता तिच्या परतण्याविषयी मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी मोठं विधान केलं आहे. मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी अलीकडेच सेटवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये दयाबेन कधी वापस येणार असा प्रश्न त्यांना विचारला होता. तेव्हा ते म्हणाले कि, “दया भाभीचे पात्र असे आहे की लोक ते विसरले नाहीत. जवळपास पाच वर्षे झाली आणि लोक अजूनही तिच्याबद्दल बोलतात. तिची अनुपस्थिती माझ्यासह सर्वांनाच जाणवते.आम्हा सगळ्यांनाच आशा आहे कि ती परत येईल.”
पण पुढे त्यांनी दिलेल्या उत्तराकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं. ते म्हणाले, ‘‘दिशा वकानी यांना दोन मुलं आहेत, काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे त्या जबाबदाऱ्या टाळून त्यांना काम करणं सध्या शक्य नाही, याची जाणीव आहे. त्यामुळे दयाबेनची भूमिका साकारण्यासाठी कलाकारांच्या ऑडिशन घेतल्या जात आहेत. परंतु तिच्या सारखी अभिनेत्री आम्हाला अद्याप सापडलेली नाही.’’ हेही वाचा - Aadesh Bandekar : बांदेकरांच्या ‘होम मिनिस्टर’ला अठरा वर्ष पूर्ण; स्पॉट बॉयच्या हातून केक कापत केलं सेलिब्रेशन पुढे ते असंही म्हणाले कि, ‘‘बदल आवश्यक आहेत. गरज पडल्यास प्रेक्षक नवा चेहरा स्वीकारतील याचीही मला खात्री आहे. मी खूप सकारात्मक व्यक्ती आहे आणि मी कधीही आशा सोडत नाही. जे होईल ते चांगल्यासाठीच होईल”
मालिकेत नुकतीच नवीन तारक मेहतांची एंट्री झाली आहे. शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्यानंतर बरेच दिवस त्यांची जागा रिकामी होती. कारण निर्मात्यांना शैलेश परतण्याची आशा होती. पण आता नवीन तारक मेहता आल्यामुळे नवीन दयाबेन पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. निर्मात्यांच्या या विधानातून स्पष्टच होत आहे कि आता मेहता साहब प्रमाणेच नवीन दयाबेनही मालिकेत दिसतील.