मुनमुन दत्ता
मुंबई, 21 नोव्हेंबर : टेलिव्हिजनचा प्रसिद्ध शो म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा. सगळ्यांच्या लाडक्या शोमधील बबीता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता हिच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. मुनमुन दत्ता नुकतीच जर्मनीला गेली होती. तिथे सुट्ट्यांचा आनंद घेत असताना अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. तिच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. मुनमुनं इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. सध्या मुनमुन बरी व्हावी यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहे. अपघात नेमका कसा झाला याबद्दल मुनमुननं काही सांगितलेलं नाही. अभिनेत्री मुनमुन दत्ता सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी जर्मनीला गेली होती. मागचे काही दिवस ती ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. ट्रिपच्या दरम्यान तिच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पायाला लागल्यानं तिनं ट्रिप अर्ध्यावर टाकून पुन्हा घरचा रस्ता गाठला आहे. एअरपोर्टवर येताच मुनमुननं डॉक्टरांचा सल्ला घेतलाय. तिच्या डाव्या पायाचे एक्सरे काढून नक्की काय झालं याचा तपास करण्यात आला. त्यानंतर मुनमुनच्या पायाला पूर्णपणे प्लास्टर करण्यात आलं आहे. अभिनेत्रीनं पायाचा फोटो शेअर केला आहे. हेही वाचा -
Naga Shaurya Wedding: साऊथचा प्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, पाहा VIDEO
मुनमुननं दुखापत झालेल्या पायाचा फोटो शेअर करत, ‘जर्मनीच्या चांगल्या आठवणी आणि दुखापत झालेला पाय घेऊन उड्डाण घेत आहे’, असं म्हणत म्हटलं आहे. तिच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला गुलाबी रंगाचं प्लास्टर करण्यात आलं असून त्यावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या चिकटवल्याचं दिसत आहे. हंबर्ग विमानतळावर विमानाची वाट पाहत असताचे फोटो आणि व्हिडीओ तिनं शेअर केलेत.
अभिनेत्री गेली अनेक वर्ष ताकर मेहता का उल्टा चश्मा या शोचा हिस्सा आहे. मुनमुननं साकारलेली बबीता प्रेक्षकांना प्रचंड आवडली. जेठालाल आणि बबीताची मस्ती प्रेक्षक नेहमीच एन्जॉय करतात.