मुंबई, 25 नोव्हेंबर : तापसी पन्नू आणि वाद-विवाद यांचं खूप जुनं नातं आहे. ती अनेकदा अशा परिस्थितीमध्ये फसते ज्यामुळे तिला अनेकदा ट्रोल केलं जातं. सोशल मीडियावर तापसीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. तापसीचा हा व्हिडीओ गोव्यात सुरू असलेल्या 50 व्या इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हल (IFFI)मधील आहे. ज्याठिकाणी तापसी ‘वुमेन इन लीड’ या सेशनमध्ये बोलत होती. या व्हिडीओमध्ये तापसी तिला हिंदी बोलण्याचा सल्ला देणाऱ्या व्यक्तीला मजेदार अंदाजात उत्तर देताना दिसली. सध्या गोव्यात 50 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. यातील एका सेशनमध्ये तापसी बोलत होती. त्यावेळी एका व्यक्तीनं माइकवर, ‘तापसी थोडं हिंदीमध्य सुद्धा बोल, कारण तू हिंदी सिनेमात काम करतेस’ असं म्हटलं. त्यावर तापसी म्हणाली, मी पूर्णपणे हिंदीमध्ये बोलू शकते कारण दिल्लीची आहे. पण मला हे माहित नाही की सर्वांना हिंदी समजेल की नाही. त्यानंतर तापसीनं तिथं उपस्थित असलेल्या सर्वांना विचारलं की सर्वांना हिंदी समजते का? त्यावर काही लोकांनी हो आणि काही लोकांनी नाही अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर ती व्यक्ती वाद घालताना दिसली. इंग्लिश का ती तर हिंदी अभिनेत्री आहे. त्यावर तापसी हजरजबाबीपणे म्हणाले सर मी साउथ इंडियन अभिनेत्री सुद्धा आहे. तर काय मी तमिळ तेलुगूमध्ये बोलू का? आता सापडली रानू मंडलची कार्बन कॉपी, सोशल मीडियावर गाण्याचा VIDEO VIRAL
तापसीच्या या प्रश्नावर त्याठिकाणी उपस्थित असलेले सर्वजण टाळ्या वाजवू लागले. तापसीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिचा सांड की आँख हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. या सिनेमात तिच्यासोबत भूमि पेडणेकर सुद्धा प्रमुख भूमिकेत होती. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला तर जमवलाच पण समीक्षकांकडूनही या सिनेमाला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. …आणि सिनेमाच्या सेटवरुन शाहरुख थेट पोहोचला तुरुंगात! ‘या’ आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश ==============================================================