JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Looop Lapeta: किसिंग सीन शुट करताना Taapsee Pannu मध्येच थांबली, थक्क करणार आहे किस्सा

Looop Lapeta: किसिंग सीन शुट करताना Taapsee Pannu मध्येच थांबली, थक्क करणार आहे किस्सा

तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या आगामी ‘लूप लपेटा’ (Looop Lapeta) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 4 फेब्रुवारीला रिलीज झालेला हा सिनेमा ‘रन लोला रन’ या सिनेमाचा रिमेक आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 फेब्रुवारी- तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या आगामी ‘लूप लपेटा’ (Looop Lapeta) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 4 फेब्रुवारीला रिलीज झालेला हा सिनेमा ‘रन लोला रन’ या सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी दिग्दर्शक आकाश भाटियाने(Akash Bhatia) तापसीसोबत असं काही केलं जे तिच्यासाठी धक्कादायक होतं. आकाशचं ऐकून अभिनेता ताहिर राज भसीन (Tahir Raj Bhasin आणि अन्य कलाकार चित्रीकरण करता करता मध्येच थांबले. याबद्दलचा एक खुलासा तापसीने केला आहे. ‘लूप लपेटा’च्या सेटवर मजेशीर किस्सा तापसीने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लूप लपेटा चित्रपटाशी संबंधित एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. किसिंग सीन सुरू असताना दिग्दर्शकाने असं काही केलं की अभिनेता ताहिर भसीन आणि मी आश्चर्यचकीत होऊन बघतच बसलो, असं तापसी रोहन जोशी सोबत युट्युब स्ट्रीमिंगच्या वेळी म्हणाली. दिग्दर्शक आकाश भाटिया किसिंग सिनच्या वेळी विचित्र कॉमेंट्री करत होते. शूटिंगवेळी साऊंड रेकॉर्डिंग बंद होतं आणि आकाश सीन रेकॉर्डिंगसाठी इन्स्ट्रक्शन देत होते. “आता भिडा, आता प्रेमानं बोला, आता हात पकडा. आता तुम्हाला किस करायचं आहे.” वाचा- ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्रीच्या आईचे निधन आकाशची कॉमेंट्री सुरूच होती.. गंमतीची बाब म्हणजे किसिंग सीन सुरू असताना दिग्दर्शक मध्येच बोलत होते. “ताहिर हिच्यापेक्षा चांगली मुलगी तू पाहिली नसशील. तुला हिच्यापेक्षा भारी मुलगी कधीच मिळणार नाही.” यावर मी किसिंगच्या मध्येच थांबले आणि ताहिरकडे पाहू लागले. मी ताहिरकडे पाहत होते की, आता हा काय करत आहे ? तर आकाश भाटिया माइकवर सीनबद्दल माहिती सांगत होते. त्यामुळे आमचा मूड दुसऱ्याच दिशेने जात होता. मग आम्ही ठरवलं की, काही वेळ आकाशला ऐकणंच बंद करायचं, असं तापसीने सांगितलं. वाचा- अशी होती राहुल वैद्य-दिशा परमारची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत, PHOTO आले समोर दरम्यान, तापसी पन्नूने पुन्हा एकदा महिला सक्षमीकरणाच्या मुद्दा पुन्हा मजबूत केला आहे. लूप लपेट हा चित्रपट दिग्दर्शक आकाश भाटिया आणि लेखक मंडळींचा एक प्रकारे विजय आहे. कारण यामध्ये रिमेकच्या आत्म्यावर ओरिजनालिटीचा नवा ढाचा चढवला आहे. विशेष म्हणजे इंग्रजीत लूपच्या स्पेलिंगमध्ये ३ ओ दाखवण्यात आले आहेत आणि चित्रपटाच्या कथेचाही तीन पद्धतीने शेवट होताना दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या