JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / नवी मालिका 'तू तेव्हा तशी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, 'या' अभिनेत्याचे छोट्या पडद्यावर पुनरागमन

नवी मालिका 'तू तेव्हा तशी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, 'या' अभिनेत्याचे छोट्या पडद्यावर पुनरागमन

मराठी प्रेक्षकांची लोकप्रिय वाहिनी म्हणजे ‘झी मराठी’(ZeeMarathi). नुकतंच झी मराठी वाहिनीने एका नव्या मालिकेचा प्रोमो शेअर चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. ‘तू तेव्हा तशी’ (TuTevhaTashi)असे नव्या मालिकेचे टायटल रिलीज करत मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.

जाहिरात

TuTevhaTashi

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 जानेवारी: मराठी प्रेक्षकांची लोकप्रिय वाहिनी म्हणजे ‘झी मराठी’ (ZeeMarathi). नुकतंच झी मराठी वाहिनीने एका नव्या मालिकेचा प्रोमो शेअर चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. ‘तू तेव्हा तशी’ (TuTevhaTashi)असे नव्या मालिकेचे टायटल रिलीज करत मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये मुख्य कलाकारांनी चेहऱ्याचा मास्क लावल्याने त्यांनी पटकन ओळखण कठीण झाले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेद्वारे अनेक वर्षांपासून मनोरंजनविश्वात अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. तर, स्वप्नील जोशी सोबत या मालिकेत शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. झी मराठी वाहिनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करत प्रेक्षकांना गोड बातमी दिली आहे. या मालिकेत चाळीशी पार केलेल्या सौरभ-अनामिकाची  प्रेमकहाणी म्हणजेच ‘तू तेव्हा तशी’. प्रेम करायचं राहून गेलं असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी तर प्रेमात असणाऱ्यांच्या नात्यात आणखी गोडवा वाढवणार, अशी हि मालिका आहे.

संबंधित बातम्या

सध्या स्वप्नील झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचा देखील एक अविभाज्य हिस्सा आहे. तू तेव्हा तशी या मालिकेत स्वप्निल जोशी हा सौरभ पटवर्धनच्या भूमिकेत तर अनामिका दीक्षितच्या भूमिकेत शिल्पा तुळसकर दिसणार आहेत.  ‘तुला पाहते रे’ मध्ये राजनंदिनीची लक्षवेधी भूमिका निभावल्यानंतर शिल्पा तुळसकर पुन्हा एकदा झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जीवलगा मालिकेत स्पप्नील दिसला होता. त्यानंतर तो कोणत्या मालिकेत दिसला नव्हता.त्यामुळे टीव्हीवर स्वप्निलला पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. सध्या अनेक मोठे कलाकार छोट्या पडद्याकडे वळत आहेत. मालिका विश्वात काहींनी पुन्हा नशिब आजमवण्यास सुरूवात केली आहे. प्रार्थना बेहेर, श्रेयस तळपदे, सचित पाटील यासारख्या कलाकारांनी मालिकेतुन पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले आहे. प्रेक्षकांचा यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या