स्वरा भास्कर लवकरच आई होणार
मुंबई, 6 जून- प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्करने लग्नाच्या सुमारे साडेतीन महिन्यांनंतर चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. स्वराने पती फहाद अहमदसोबत काही खास फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. सोबत तिनं म्हटलं आहे की, लवकरच ती आई होणार आहे. या फोटोंमध्ये स्वराचा बेबी बंपही देखील दिसत आहे. स्वरानं सोशल मीडियावर फहाद अहमदसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या फोटोला स्वरानं कॅप्शन दिलं आहे की, ‘कधीकधी तुमच्या सर्व प्रार्थनांची उत्तरं तुम्हाला मिळतात! धन्य, कृतज्ञ आणि उत्साही भावनांनी आम्ही नवीन जगात पाऊल ठेवले आहे.‘स्वरा भास्करने ही गुडन्यूज शेअर केल्या नंतर सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मागच्या काही दिवसांपासून स्वरा भास्कर तिच्या प्रेग्नेंशीमुळं सोशल मीडियावर चर्चेत आहे.आलियाप्रमाणेच स्वरा देखील लग्नाआधीच प्रेग्नेंट असल्याचे नेटकऱ्यांचे मत होतं, यावरून तिला अनेकदा ट्रोल देखील केलं होतं. मागच्या काही दिवसात तर स्वरा आई झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या.एका न्यूज चॅनेलचे बनावट स्क्रीनशॉट शेअर करून असा दावा केला होता की स्वरा आई झाली आहे.
स्वरा भास्कर ही आउट-ऑफ-द-बॉक्स चित्रपट करणारी अभिनेत्री आहे. स्वरा नेहमी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असते. स्वरा भास्कर केवळ चित्रपटांमध्येच सशक्त भूमिका करत नाही, तर वैयक्तिक आयुष्यातही कठोर निर्णय घेणारी अभिनेत्री आहे.
स्वरा भास्करच्या लग्नाची साडी होती खास- लग्नाची साडी स्वरासाठी फारच खास होती. अभिनेत्रीने ट्विट करत ही साडी आणि सोबतच हे दागिनेसुद्धा आपल्या आईचे असल्याचं तिने सांगितलं होतं. स्वरानं आईची साडी लग्नात नेसली होती. तिचे याच याडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या साडीत स्वरा तिचा बेबी बंपही लपवत असल्याचं म्हणतं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं.