मुंबई, 8 जून : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन बऱ्याच काळानंतर अभिनय क्षेत्रात एन्ट्री करीत आहे. हॉटस्टारची ओरिजनल वेब सीरिज ‘आर्या’मध्ये ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातून सुष्मिताने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. आता बऱ्याच काळातनंतर सुष्मिता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सोशल मीडियावर सुष्मिता सेन सक्रिय आहे. वारंवार ती आपल्या आगामी वेब सीरिजविषयी पोस्ट टाकत आहे. सुष्मिता सेन हिची आर्या नावाची वेब सीरिज 19 जून रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजचा ट्रेलरने लोकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. यामध्ये सुष्मिता सेन हिची भूमिका बोल्ड दाखविण्यात आली आहे. यामध्ये सुष्मिता सेनबरोहर चंद्रचूड सिंह, सिंदर खेर, नामित दास यांसारख्ये चांगल्या कलाकारांचाही सहभाग आहे. राम माधवानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
प्रेक्षकांमध्ये या ट्रेलरची जोरदार चर्चा सुरू आहे. या वेबसीरिजमध्ये सुष्मिता सेन वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये ही वेब सीरिजबद्दल उत्सुकता आहे. हे वाचा- संपूर्ण देश झाला ‘अनलॉक’; मात्र या 2 राज्यांनी वाढवला लॉकडाऊन भारतात तयार होणार कोरोनावरचं हे औषध, 5 कंपन्यांना पाहिजे उत्पादनाची परवानगी