JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सुष्मिता सेन-ललित मोदीच्या लग्नाच्या बातमीत मोठा ट्विस्ट, 30 मिनिटात बदललं रिलेशन

सुष्मिता सेन-ललित मोदीच्या लग्नाच्या बातमीत मोठा ट्विस्ट, 30 मिनिटात बदललं रिलेशन

काही दिवसांपूर्वी रोहमनसोबत ब्रेकअप केल्यामुळे सुष्मिता सेन चर्चेत आली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जुलै : अवघ्या काही वेळापूर्वी आयपीएलचे फाऊंडर आणि प्रसिद्ध बिझेनसमन ललित मोदी यांनी (Sushmita Sen Lalit Modi dating) एक ट्विट केलं होतं. या ट्विटनंतर एकच चर्चा सुरू झाली होती. अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदीच्या लग्नाच्या बातमीमुळे व्यावसायिक क्षेत्रासह बॉलिवूडमध्येही जोरदार चर्चा सुरू झाली होती. साधारण 7.54 वाजता ललित मोदीने सुष्मिता सेनचा बेटरहाफ म्हणून उल्लेख केला होता. याशिवाय नव्या आयुष्याची सुरुवात करीत असल्याचंही म्हटलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतर सुष्मिता आणि ललित मोदीच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होता. अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं होत. तर अनेकांनी त्यांना नव्या आयुष्याच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. दरम्यान 30 मिनिटानंतर ललित मोदीने आपल्या ट्विटचं स्पष्टीकरण दिलं. अद्याप लग्न झालं नसून एकमेकांना डेट करीत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सुष्मिताचा बायको ते गर्लफ्रेंड असा उलटा प्रवास झाला असं म्हटलं जात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आपल्या लव लाइफवरुन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुष्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून रोहमन शॉलसोबत ब्रेकअपमुळे चर्चेत होती.

रोहमनसोबत ब्रेकअप केल्यानंतर सुष्मिता ललित कुमार मोदी (Lalit Kumar Modi) यांना डेट करीत आहे. ललित मोदीने स्वत: याबाबत माहिती दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या