JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत भावुक झाली बहीण श्वेता; केली परत येण्याची मागणी

सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत भावुक झाली बहीण श्वेता; केली परत येण्याची मागणी

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंग कीर्तीनं (Sushant’s Sister Shweta Singh Kirti) सुशांतसाठी एक पोस्ट केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा    (Sushant Singh Rajput Death)  मृत्यू ही कलाकारांसोबतच चाहत्यांसाठी सर्वात धक्कादायक बातमी होती. जून 2020 मध्ये या अभिनेत्यानं मुंबईत अखेरचा श्वास घेतला होता. सुशांतच्या मृत्यूला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. चाहते अनेकदा सुशांत सिंह राजपूतची आठवण करून देणार्‍या पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यासोबत, दिवंगत अभिनेत्याची बहीण श्वेता सिंग कीर्तीनं   (Sushant’s Sister Shweta Singh Kirti)  सुशांतसाठी एक पोस्ट केली आहे. जी नक्कीच तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल. त्याने दिवंगत अभिनेत्याचा फोटोही शेअर केला आहे. बहीण श्वेता सिंह कीर्तीनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुशांत सिंग राजपूतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो पांढऱ्या टी-शर्ट आणि काळ्या टोपीमध्ये त्याचा डॅपर लुक दाखवताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये, श्वेतानं एक भावनिक विचार लिहिला आहे, आणि तिच्या दिवंगत भावाला परत येण्याची विनंती केली आहे. तिनं लिहिलं आहे, “जेव्हा शक्य होतं आणि आता अशक्य आहे याच्यामध्ये आपण पहिल्यांदा भेटलो होतो'.

संबंधित बातम्या

सुशांत सिंहची बहीण श्वेता सिंह कीर्तीनं (Reacalled SSR) सेल्फम्युझिंग म्हणजे ‘आत्मनिरीक्षण’ आणि हॅशटॅग कमबॅक म्हणजेच परत ये असा मेसेज लिहिला आहे.श्वेताच्या या पोस्टवर सुशांतच्या चाहत्यांनीही कमेंट करायला सुरुवात केली आहे. आणि डोळ्यात अश्रू आणि हात जोडलेल्या इमोजीने कमेंट करून आपल्या दिवंगत भावाची आठवण काढली आहे. ही पोस्ट आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सुशांत सिंहचे चाहते त्याच्या बहिणीला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय तिला स्ट्रॉंग होण्याचा सल्ला देत आहेत. काही चाहत्यांनी तर सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. **(हे वाचा:** सुशांंतच्या बहिणीने ‘न्याय’ मिळण्यासंदर्भात सोशल मीडियावर केली ) श्वेता सिंह कीर्ती अनेकदा तिच्या दिवंगत भावासाठी हृदयस्पर्शी पोस्ट शेअर करताना दिसते. यापूर्वी, जेव्हा सुशांतच्या ‘छिछोरे’ला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. तेव्हा श्वेतानं दिवंगत अभिनेत्याचा छिछोरेच्या टीमसोबतचा एक फोटो शेअर केला होता. आणि लिहिलं होतं, “भावा हा अभिमानाचा क्षण आज सर्वांसोबत शेअर करत आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात माझ्या भावाच्या भावना आमच्यासोबत आहेत. हा पुरस्कार माझ्या भावाला समर्पित होताना पाहून माझं उर अभिमानानं भरून आलं आहे. छिछोरेच्या संपूर्ण टीमचे आभार आणि अभिनंदन.” **(हे वाचा:** अभिनेत्री Jacqueline Fernandez ला ईडीचा मोठा दणका; भारताबाहेर जाण्यावर बंदी कायम ) श्वेता सिंह कीर्तीनं अलीकडेच सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. अभिनेत्री अंकिता लोखंडेनं नुकतंच छत्तीसगडचा उद्योगपती विक्की जैनसोबत लग्न केलं आहे. तसेच श्वेतानं अंकिता आई आपला एक थ्रोबॅक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर अंकिताने रिपोस्ट करत ‘खूप खूप आभारी आहे श्वेता दीदी’ अशी कमेंट केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या