सुशांत सिंह राजपूत
मुंबई, 17 जानेवारी- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या निधनाला आता 3 वर्षे पूर्ण होत आली आहेत.त्याचे चाहते आजही त्याच्या आठवणीत रमलेले असतात. सतत सोशल मीडियावर सुशांतचे जुने व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसून येतात. अभिनेत्याचा अफाट मोठा चाहतावर्ग आहे. चाहते सुशांतबाबत ऐकून घ्यायला नेहमीच उत्सुक असतात. परंतु सुशांतच्या चाहत्यांसाठी पुन्हा एक दुःखद बातमी आहे. अभिनेत्याचा अत्यंत लाडका फज अर्थातच त्याच्या पाळीव कुत्र्याचं निधन झालं आहे. ही माहिती समोर येताच सर्वच दुखी झाले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर तीन वर्षांनी फज या जगातून निघून गेला आहे. अभिनेत्याची बहीण प्रियांका सिंहने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ही बातमी शेअर करत सर्वांना सांगितलं आहे. या बातमीनंतर सुशांत सिंहचे चाहते दुखी झाले आहेत. **(हे वाचा:** Rakhi Sawant Controversy: सलमान खानमुळे वाचलं राखीचं लग्न; आदिल-भाईजानच्या ‘त्या’ फोनकॉलमध्ये असं काय घडलं? ) सुशांत सिंह राजपूतची बहीण प्रियांका सिंहने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट केलं आहे. यामध्ये प्रियंकाने दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत आपल्या लाडक्या फजसोबत वेळ घालवताना दिसून येत आहे. तर दुसऱ्यामध्ये स्वतः प्रियांका फजसोबत बसलेली दिसून येत आहे. प्रियांकाने फोटो शेअर करत लिहलंय, ‘किती दूर फज… तूसुद्धा आता तुझ्या मित्राच्या स्वर्गात सहभागी झालास. लवकरच आम्ही पण सोबत येऊ. तोपर्यंत मनात वेदना होत राहणार’. असं म्हणत प्रियांकाने सर्वांनाच भावुक केलं आहे.
सुशांतच्या बहिणीच्या या ट्विटनंतर अभिनेत्याच्या अनेक चाहत्यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. एका युजर्सने प्रियंकाला रिप्लाय करत लिहलंय, ‘दीदी कृपा करुन तुम्ही खंबीर राहा. आम्ही काय बोलू हेच सुचत नाहीय’. तर दुसऱ्याने लिहलंय, ‘हृदय दुखावणारी बातमी आहे’. तर आणखी एकाने लिहलंय, ‘तुम्ही सकारात्मक विचार करा.. तो त्याच्या मित्राजवळ राहण्यासाठी गेलाय असं तुम्ही समजवा स्वतःला’. अशा अनेक कमेंट्स सध्या या ट्विटवर पाहायला मिळत आहेत.