JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / SSR Suicide: 'सत्याचा विजय होतो', रियावर FIR दाखल झाल्यानंतर EX-गर्लफ्रेंड अंकिताचे सूचक ट्वीट

SSR Suicide: 'सत्याचा विजय होतो', रियावर FIR दाखल झाल्यानंतर EX-गर्लफ्रेंड अंकिताचे सूचक ट्वीट

सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे गेल्या दीड महिन्यापासून सोशल मीडियावर फार सक्रीय नाही आहे. दरम्यान तिने सुशांतच्या मृत्यूबाबत सूचक ट्वीट केले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते. नेपोटिझम, नैराश्य यांसारख्या अनेक बाबींना सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आले होते. सुशांतच्या सर्वात जवळच्या व्यक्तींनी देखील आता याबाबत मौन सौडण्यास सुरुवात केली आहे. सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या दीड महिन्यापासून सोशल मीडियावर सक्रीय नाही आहे. दरम्यान तिने सुशांतच्या मृत्यूबाबत सूचक ट्वीट केले आहे. ‘सत्याचा विजय होतो’, एवढेच ट्वीट करत तिने सुशांतच्या  मृत्यूबाबत भाष्य केले आहे.

संबंधित बातम्या

सुशांतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे पूर्णपणे कोलमडली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर जवळपास महिनाभराने तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने देवासमोर लावलेल्या एका दिव्याचा फोटो शेअर केला होता आणि त्याला CHILD OF GOD असे कॅप्शन दिले होते. त्याचप्रमाणे तिने ‘दिल बेचारा’च्या प्रदर्शनाआधी देखील एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने सुशांतच्या या शेवटच्या सिनेमाचे पोस्टर शेअर केले होते. त्यानंतर आज अंकिताने ‘TRUTH WINS’ अशी पोस्ट केली आहे. यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. पण सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात FIR दाखल झाल्यानंतर अंकिताने हे ट्वीट केले आहे. त्यामुळे तिला देखील याबाबत संशय होता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (हे वाचा- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपासून बिहार पोलीस मुंबईत दाखल होईपर्यंत काय घडलं? ) सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनानंतर सातत्याने मुंबई पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या परिवाराविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर अत्यंत गंभीर आरोप केले आहे. याप्रकरणी आता बिहार पोलीस देखील तपास करत आहे. बिहार पोलिसांचा तपास स्वतंत्रपणे सुरू झाला आहे. (हे वाचा- सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा घराबाहेर दिसली EX-गर्लफ्रेंड अंकिता ) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी आता मुंबई पोलिसांबरोबरच बिहार पोलीस देखील तपास करत आहेत. दरम्यान रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिच्यावर पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी जी एफआयआर दाखल करण्यात आली आहे, त्या प्रकरणाची सर्व बाजुंनी चौकशी सुरू राहील तसंच सध्या प्राथमिक पातळीवर चौकशी सुरू आहे, अशी देखील माहिती बिहार पोलिसांकडून मिळते आहे. मुंबई पोलिसांच्या अंधेरी क्राइम ब्रांच याठिकाणी मंगळवारपासून बिहार पोलिसांची ये-जा सुरू आहे. त्यावेळी बिहार पोलिसांचे पोलीस निरीक्षक कैसर आलम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या