JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / "सुशांतच्या पैशांतून रिया चक्रवर्ती करायची पार्टी", फार्महाऊस मॅनेजरने केला मोठा खुलासा

"सुशांतच्या पैशांतून रिया चक्रवर्ती करायची पार्टी", फार्महाऊस मॅनेजरने केला मोठा खुलासा

सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) ज्या फार्महाऊसवर ड्रग्ज पार्टी व्हायची असं रिया चक्रवर्तीने सांगितलं होतं, त्या फार्महाऊसच्या मॅनेजरने (farmhouse manager) मोठी माहिती दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन यंत्रणा तपास करत आहे. नार्कोटिक्स विभागाने तर ड्रग्ज अँगलच्या तपासात अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शोविकसह काही जणांना अटक केली आहे. शिवाय आणखी काही जणांची चौकशी सुरू आहे. दरम्यान याबाबत आता सुशांतच्या फार्म हाऊसचा मॅनेजर (Farmhouse Manager) पवनने सुशांत, रिया आणि तिच्या कुटुंबाबाबत मोठा खुलासा केला आहे. सुशांत आपल्या लोणावळ्यातील फार्महाऊसवर ड्रग्ज पार्टी करायचा. त्यामध्ये त्याचे सेलेब्रिटी मित्र नेहमी ड्रग्स घेत असत, असा कबुलीजबाब रियाने एनसीबीला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. दरम्यान सुशांतच्या फार्महाऊस मॅनेजर पवनचीही सीबीआयने चौकशी केली आहे. त्यानंतर रिपब्लिकन टीव्हीशी बोलताना त्याने सुशांत आणि रियाबाबत मोठी माहिती दिली आहे. पवनने सांगितलं, “रिया चक्रवर्ती आपला सर्व खर्च आणि पार्ट्यांसाठी सुशांतचा पैसा वापरत होती. रजत मेवातीने मला सांगितलं होतं की, रिया पार्टी करायची आणि सुशांत झोपलेला असायचा. जेव्हा कधी मी शोविकला पाहिलं तेव्हा तो नशेत असयचा किंवा स्मोक करत असायचा. रिया सुशांतचा पैशांचा व्यवहार स्वतः सांभाळायची. रजतने मला सांगितलं होतं की, सुशांतच्या बँक खात्यातून पैसे काढले जात आहेत. सुशांतने जेव्हा रियाच्या करत असलेल्या या खर्चाबाबत समजलं तेव्हा तो खूप नाराज झाला होता” हे वाचा -  “यें बलात्कार है”, म्हणत संतप्त झालेल्या कंगना रणौतने शेअर केले PHOTO “श्रुती मोदीने 2019 जुलैपासूनच येणं सुरू केलं होतं. रिया आल्यानंतर त्यांचा आयलँड ट्रिप वाढली होती.  शिवाय रिया फार्महाऊसवर नेहमी सुशांतसोबत यायची. गेल्या वर्षी 8 जुलैला रियाचा बर्थडे होता. वाढदिवसाच्या एक दिवस आधी मी रियाच्या कुटुंबाला पाहिलं. रियाचे आई-वडील आणि भाऊ शोविकला पाहिलं. शोविकसह एक तरुणीही होती”, असं पवन म्हणाला. हे वाचा -  सुशांतची हत्या की आत्महत्या? उद्या येणार व्हिसेरा रिपोर्ट,खुलासा होण्याची शक्यता सीबीआयने आपली कित्येक तास चौकशी केली. सुशांत आणि रियाबाबत विचारलं. त्यावेळी आपण हे सर्वकाही सांगितल्याचं पवनने म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या