JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / EXCLUSIVE : रियाच्या भावाच्या बँक खात्यावरून महत्त्वाची माहिती आली समोर

EXCLUSIVE : रियाच्या भावाच्या बँक खात्यावरून महत्त्वाची माहिती आली समोर

CNN News18 च्या कडे रियाच्या (Rhea Chakraborty) भावाच्या शोविक चक्रवर्तीच्या बँक अकाउंटविषयी धक्कादायक माहिती आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant singh rajput demice) सक्तवसुली संचालनालयाने (ED) सुरू केलेल्या चौकशीनंतर वेगळाच मुद्दा प्रकाशात येत आहे. आता CNN News18 च्या कडे रियाच्या (Rhea Chakraborty) भावाच्या बँक अकाउंटविषयी माहिती आली आहे. त्यावरून शोविक चक्रवर्तीच्या (Showik Chakraborty) खात्यात थेट सुशांतच्या खात्यातून करोडो रुपये ट्रान्सफर झाल्याचं स्पष्ट होत आहे. New18 च्या सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांतच्या खात्यातून थेट शौविकच्या खात्यात पैसे वळवण्यात आल्याच्या नोंदी आहेत. कोटक बँकेतून हे पैशाचे व्यवहार झाल्याचं या अकाउंट्सवरून स्पष्ट होतं. ईडीने रियाबरोबर तिचा भाऊ, वडील आणि सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अभिनेत्रीला आज ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. त्याबरोबर तिचा भाऊ शोविकचीही कसून चौकशी करण्यात आली. रियाबरोबर तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि वडील इंद्रजित चक्रवर्ती देखील चौकशी करता हजर होते. आज सुरू असलेल्या या ईडी चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान न्यूज18 च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रियाच्या 2 प्रॉपर्टीसंदर्भात तिची चौकशी केली जात आहे. त्याचप्रमाणे तिची बँक स्टेटमेंट, इनकम टॅक्स रिटर्न, उत्पन्नाचे साधन आणि बचत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. वाचा - कोण आहे श्रुती मोदी? सुशांत मृत्यूप्रकरणी CBI चा हिच्याही विरोधात गुन्हा त्याचप्रमाणे सुशांत सिंह राजपूतने 2019 ते जानेवारी 2020 या काळात 2 कंपन्या निर्माण केल्या, त्यामध्ये रियाचं योगदान काय त्याबाबत प्रश्न विचारले जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. रियाच्या 2 मालमत्तांची कागदपत्रं देखील ईडीकडून मागण्यात आले आहे. तिचे वडील आणि भाऊ ज्या 2 कंपन्यांचे संचालक आहेत, त्याबाबत देखील काही प्रश्न विचारण्यात येत आहेत. जवळपास 3 तासांहून अधिक काळ रियाची चौकशी अद्याप सुरू होती. दरम्यान तिचा भाऊ शौविक ईडी ऑफिसमधून बाहेर पडला आणि पुन्हा तासाभरात कपडे बदलून चौकशीसाठी ईडी ऑफिसमध्ये दाखल झाल्याचं वृत्त ANI ने दिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या